गेवराईत कपड्याच्या दुकानाला भीषण आग, लाखोंचे नुकसान

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.20नोव्हेंबर):-शहरातील मोमिनपुरा भागातील कोहीनुर कपड्यांचा दुकानाच्या गोदामाला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी दि.20 रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. यात कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही.

या बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मोमिनपुरा भागात कपड्यांचे कोहीनूर दुकान व गोदाम आहे. या कंपड्याच्या दुकानातील गोदामध्ये ठेवण्यात आलेल्या कपड्यांना अचानक शनिवार दि.20 रोजी दुपारी चारच्या सुमारास आग लागली या अगिने हळूहळू रोद्ररूप धारण केले. दुकाना आग लागल्याची माहिती अजू बाजूच्या नागरिकांना माहित होतच त्यांनी दुकानाकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.

ही आग एवढी भयानक होती की, आग विझविण्यासाठी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला व काही खाजगी वाहानाला पाचारण करण्यात आले. आग विझवण्यासाठी सर्वांने शर्थीचे प्रयत्न केले. सदरील आग आटोक्यात आणण्यासाठी भरपुर वेळ लागला. या अगित दुकान मालकाचे लाखो रूपयांचा लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून ही आग कशामुळे लागली यांची माहिती अद्याप मिळालेली नसून यात कोणत्याही प्रकारची जिवित हानी झालेली नाही.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED