निवडणूक पार्श्वभूमीवर जोमाने कामाला लागावे; युवक राष्ट्रवादी पक्ष निरीक्षकांच्या सूचना

25

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.20नोव्हेंबर):- आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे अशा सूचना युवक पक्ष निरीक्षक अजित घुले यांनी पदाधिकाऱ्याना दिल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते.नाशिक महापालिका निवडणूक तोंडावर आली असून निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विविध सामाजिक कार्यातून जनतेसमोर जात आहे. सामाजिक कार्यासोबतच बूथ कमिटी सक्षम करणे तेवढच आवश्यक असल्याचे युवक पक्ष निरीक्षक अजित घुले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले.

मतदान नोंदणी करिता ३० नोव्हेंबर शेवट असल्याने जास्तीत जास्त मतदान शिबीर राबवावे, जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातील आंदोलन हे आक्रमक स्वरूपाचे होणे गरजेचे असल्याने आक्रमक आंदोलनामुळेच जनता लक्षात ठेवते. सामाजिक कार्याकरिता केलेले आंदोलनाला यश मिळाल्यास त्याची जनतेला माहिती व्हावी याकरिता प्रसिद्धी होणे सुद्धा तेवढच आवश्यक असल्याने सोशल मिडियाचा जास्तीत जास्त वापर करावा. यासर्व बाबींमुळे निवडणुकीच्या काळात जनतेसमोर जाणे सोपे होईल व पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडणून आणण्यास मदत होईल. युवकांमध्ये सर्वात जास्त ताकद असल्याने याची ऊर्जा निवडणुकीच्या काळात जनतेपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. जास्तीत जास्त नगरसेवक निवडणून आल्यास याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकी वेळी होईल.

याच बरोबर निवडणूक काबीज करण्याचा सल्ला यावेळी युवक पक्ष निरीक्षक अजित घुले यांनी पदाधिकाऱ्याना देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या इतर समस्या जाणून घेतल्या.

यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक प्रदेश पदाधिकारी सचिन पिंगळे, शादाब सय्यद, विधानसभा अध्यक्ष जय कोतवाल, बाळा निगळ, राहुल तुपे, रामदास मेदगे, विभाग अध्यक्ष सोनू वायकर, संतोष जगताप, सागर बेदरकर, विशाल डोके, राहुल कमानकर, कल्पेश कांडेकर, शहर पदाधिकारी नवराज रामराजे, निलेश सानप, डॉ.संदीप चव्हाण, निखिल भागवत, संदीप गांगुर्डे, प्रशांत नवले, विकी डहाळे, सुनिल घुगे, जितेंद्र जाधव, अक्षय पाटील, विशाल माळेकर, संदीप खैरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.