वाघीनीने महिला वनरक्षकाला मारलेल्या परीसरात पर्यटकाना जाण्यास बंदी- आणखी त्याच जागी वाघीनीचे मिळाले लोकेशन

29

✒️प्रतिनिधी नेरी(नितीन पाटील)

नेरी(दि.21नोव्हेंबर):-व्याघ्र पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र अभयारण्यामध्ये १९ नोव्हेबंर ते २६ नोव्हेबंर २०२१ या कालावधीत वन्यप्राणी गणना होत आहे. प्राण्याची गणना करण्याकरीता ट्रांजीस्ट लाईन टाकण्याचे काम ताडोबा अभयारण्यातील पाणवठ्यावर सुरू आहे. त्यामूळे २० नोव्हेबंरला सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास वनरक्षक स्वाती नानाजी ढोमणे या वनमजुर व चौकीदारासोबत कर्तव्यावर गेल्या होत्या. कोलारा गेट जवळ कोअर झोनमध्ये पाणवठा ९७ कडे जात असताना जवळपास २०० मीटर अंतरावर अचानक समोर माया वाघीन दीसली. त्यामूळे वनरक्षक यांनी जागेवर मजुरासोबत थांबल्या.

समोर हौशी पर्यटक वाघीनीचे फोटो काढीत असल्यामूळे तीच्या मार्गात आडकाठी येऊ नये म्हणुन त्या वनरक्षक थांबून राहील्या, तीचा रस्ता चुकवून बाजुने जाण्याचा प्रयत्न करताच गवतातुन सरळ वाघीनीने महीला वनरक्षकावर हल्ला चढवीला. वाघीनीने स्वाती यांना जंगलात ओढत नेउन वनक्षेञ क्रमांक ९६ मध्ये नेत ठार केले .

त्या “माया” वाघीनीवर लक्ष ठेवण्यासाठी वनवीभागाने ट्रप कॅमेरे लावले होते. ते पुन्हा एकदा त्या वनरक्षकाला ठार केलेल्या जागेवर वाघीन आल्याचे वनवीभागाला २१ नोव्हेंबरला ट्रप कॅमेऱ्यात लोकेशन मीळाले. पर्यटकाना त्या कोअर क्षेञात जाण्यास बंदी केली गेली आहे.हे माया वाघीन पर्यटकाना भुरळ घालणारी २० नोव्हेबंरला वनरक्षकाला हल्ला चढवून ठार केले. त्यामूळे वनवीभागातीतही दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे.