महामुक्काम आंदोलनाचा धसका महावितरण नमले

51

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24नोव्हेंबर):- तालुक्यातील डोंगरी भागात नेहमी होणारा अनियमीत वीजपुरवठा व सक्तीची विजबील वसुलीची या अन्यायविरोधात डोंगरी जन परिषदेतर्फे महावितरणाच्या उपअभियंता कार्यालयावर महामुक्काम आंदोलन केले जाणार होते. महामुक्काम आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आंदोलना पुर्वीच वीज विभागाकडून डोंगर भागातील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या.डोंगरभागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात लाईट खात्याकडून दररोज आठ तास लाईटचा पुरवठा करण्यात येईल तसेच डोंगर भागातील वीजेचे रोहीत्र डिपीमध्ये काही बिघाड झाल्यानंतर तात्काळ दुरुस्त करून बसवण्यात येईल.

अशा प्रमुख मागण्यांसह ईतरही काही मागण्या वीज विभागाकडून मान्य करण्यात आल्या असून डोंगरी जन परिषदेच्या शिष्टमंडळा सोबतच्या झालेल्या या बैठकीत उपकार्यकारी अभियंता श्री म्हात्रे साहेब यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले. सदरील बैठक गंगाखेड पोलिस स्टेशनमध्ये गंगाखेड पोलिस स्टेशनच्या कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर ,पोलीस उपनिरिक्षक श्री गायकवाड यांनी डोंगरी जन परिषदेच्या शिष्टमंडळा सोबत महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन डोंगर भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले .

या वेळी डोंगरी जन परिषदेच्या शिष्टमंडळाचे नेत्रुत्व मुख्य संयोजक श्री.पंडितराव घरजाळे , आश्रोबा दत्तराव सोडगीर, पंडित निवृत्ती सोडगीर ,शंकर आण्णा रुपनर ,दशरथ मोटे ,शिताराम देवकते ,विजयकुमार गरड,भगीरथ फड, दत्तराव आयणीले, लक्षमन हुलाजी दवकते आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.