शिक्षण घेऊन स्वतःसह समाजाचा उद्धार शक्य होईल- ठाणेदार अविनाश मेश्राम

32

🔸बोथली येथे पोलिस काका व पोलिस दीदी उपक्रम

✒️शेगाव बू(मनोज गाठले,विशेष प्रतिनिधी)मो:-97678 83091

शेगाव(दि.24नोव्हेंबर):-शाळा हा व्यक्तीमत्वाचा पाया असुन विद्यार्थी दशेपासुनच अभ्यासक्रमाव्यतिरीक्त महिला विषयक कायदे, सायबर गुन्हे, रस्ता सुरक्षा नियम या विषयी माहीती आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेबांनी सांगीतल्या प्रमाणे शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. राष्ट्रपिता महत्मा फुले यांनीही शिक्षणाचे महत्व विषद केले आहे. त्यामूळे प्रत्येकाने शिक्षण घेऊन स्वतःसह समाजाचा उद्धार शक्य होईल असे मार्गदर्शन शेगाव पोलिस स्टेशनचे ठानेदार अविनाश मेश्राम यांनी केले.
पोलिस प्रशासनाची प्रतिमा अधिक समाजोमुख करण्या करीता पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांचे संकल्पनेतुन संपुर्ण जिल्ह्यात पोलिस काका व पोलीस दिदी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना महिला विषयक कायदे, सायबर गुन्हे, रस्ता सुरक्षा नियम, स्पर्धा परीक्षा विषयीची माहीती देण्यात येणार आहे.

शेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिमूर तालुक्यातील बोथली येथील भिवाजी वर्भे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे या उपक्रमा अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शेगाव पोलीस स्टेशनचे ठानेदार अविनाश मेश्राम मार्गदर्शन करीत होते.

सदर मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षस्थानी भिवाजी वर्भे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्भे मॅडम, प्रमुख अतिथी पोलीस उप निरीक्षक जाधव, पोलीस पाटील आनंद थुटे, तथा प्राध्यापक मंचावर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना बोलके केल्याने त्यांच्यात आत्मविश्वास वाढल्याचे दिसुन आले. पोलीस प्रशासणाच्या या समाजाभिमुख उपक्रमाविषयी विद्यार्थी, शिक्षक तथा गावकऱ्यांनी आंनद व्यक्त केला. ज्याने पोलीस प्रशासणाची प्रतिमा स्वच्छ होऊन जनता व पोलीसांमधील संबध सुधारण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक केली. या उपक्रमा विषयी विद्यार्थी व शिक्षकांनी शेगाव पोलीस स्टेशनचे आभार मानले.