मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 27 रोजी बैठक आयोजित

🔸1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारणार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. 24नोव्हेंबर):-1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 1 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. दावे व हरकती स्विकारण्याबाबत विशेष मोहीम 27 व 28 नोव्हेंबर रोजी राबविन्यात येणार आहे. तसेच विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 27 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

असा आहे कार्यक्रम :
सोमवार, दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध, दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. दावे व हरकती स्वीकारण्याची विशेष मोहीम शनिवार दि.13 नोव्हेंबर व रविवार दि. 14 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आली. तसेच येत्या शनिवारी दि. 27 नोव्हेंबर व रविवार दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी दावे व हरकती स्विकारण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.दावे व हरकती सोमवार, दि. 20 डिसेंबर 2021 पर्यंत निकालात काढण्यात येतील. तर बुधवार दि. 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल.

दावे व हरकती सादर करण्याच्या कालावधीत पहिली भेट म्हणून मतदार यादी निरीक्षक तथा नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता खासदार, आमदार तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विशेष मोहीमेच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून दावे व हरकती स्वीकारणार आहे.तरी, ज्या मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अशा नागरिकांनी नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव नोंदणी करून घ्यावे व उपलब्ध संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED