भिम पॅंथर सामाजिक संघटना पुसद तर्फे भारतीय संविधान दिन साजरा

33

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27नोव्हेंबर):-येथील भिम पॅंथर न्यायाची डरकाळी सामाजिक संघटनेच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक विद्यालय पुसदचे पर्यवेक्षक तथा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष , विविध पुरस्काराने सन्मानित असलेले व्यक्तिमत्व शिवशंकर घरडे सर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून भीम पँथर सामाजिक संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ताईसाहेब लहाने , सीमाताई आसोले ह्या उपस्थित होत्या.सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार ,विश्वरत्न,भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मेणबत्ती प्रज्वलित करून पूजन करण्यात आले व प्रतिमेला पुष्पमाला वाहून अभिवादन करण्यात आले.

त्या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवशंकर घरडे यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून, शिक्षक गौरव पुरस्कार , राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय गुणवंत गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळवल्या बद्दल त्यांचा भीम पँथर सामाजिक संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शिवजयंती निमित्य आयोजित पोवाडा गायन स्पर्धेत बालगायिका भिमकन्या जगताप हिने महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक मिळवल्या बद्दल तिचाही भीम पँथर सामाजिक संघटने तर्फे सत्कार करण्यात आला .
भारतात अनेक धर्म, जाती,पंथाचे लोक राहतात.त्यांच्या बोलीभाषा,वेषभूषा, संस्कृती,परंपरा यात विविधता आढळते.

या सर्वांना एकत्र जोडून ठेवण्याचे काम भारतीय संविधान करते.स्वातंत्र, समता बंधुता,न्याय यावर आधारित भारतीय संविधानाणे आपल्या सर्वांना हक्क आणि अधिकार दिले आहेत.याच संविधानाच्या आधारे आपल्या देशाचा संपूर्ण कारभार चालतो.अशा या भारतीय संविधानाचा आदर,मान-सन्मान आणि त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.असे मत शिवशंकर घरडे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन भाऊसाहेब जगताप यांनी केले तर आभार भीम पँथर मराठा आघाडी युवा जिल्हा अध्यक्ष विजय जाधव यांनी मानले. यावेळी अक्षय खिल्लारे,यश पोले,समाधान बळी, करण जोगदंडे, श्रद्धा आसोले, छायाबाई जाधव यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.