शहीद टिपू सुलतान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमे आयोजन

28

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.28नोव्हेंबर):-येथे हजरत शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त गंगाखेड येथे टिपू सुलतान जयंती कमिटीच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी अकराच्या दरम्यान फळ व खिचडीचे वाटप करण्यात आले नंतर गरजवंतांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले व संध्याकाळी 7:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी संविधान दिवस साजरा करण्यात आला तसेच 26/11 मधील दहशतवादी हल्ल्यातील वीर शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले.

यावेळी गंगाखेड पोलीस स्टेशनच्या पीआय वसुंधरा बोरगावकर मॅडम यांनी 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यावेळच्या कांही घटना सांगत आपणही देशाप्रती सतर्क प्रमाणिक राहुन आपल्या देशातील सर्वांची काळजी घेत देश हिताच्या व सुरक्षेच्या कार्यामध्ये राहिले पाहिजे कारण हे जे शहीद जवान झालेले आहेत यांनाही घर परिवार आहेत परंतु आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांनी आपल्याला परिवार समजून आपल्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशवासीयांचे प्राण वाचवावे या हेतूने दहशतवाद्यांशी ते लढत लढत शहीद झाले अशा महान वीरांना शहिदांना आपण सतत आठवणीत ठेवले पाहिजे व देशाच्या मानव जातीच्या विरोधात काही कुठे षड्यंत्र आपल्या नजरेत आढळून आले तर आपण ही आपले कर्तव्य आपली जबाबदारी समजून पोलीस प्रशासनाला माहिती दिली पाहिजे अशेही बोरगावकर मॅडम यावेळी बोलत असताना म्हणाल्या.

याप्रसंगी शहरातील सय्यद इस्माईल, इंतेसार सिद्दिकी, अजमत खान, अमजद खान, सय्यद अरशद, सय्यद जमीर, रोहिदास लांडगे, भीमराव कांबळे, शेख खाजा, शेख शकील फिरोज खान,बाबा खान,संदिप ठावरे,रतन मुंगे,तालसाराम चौधरी, आशिष यादव,बाबूराम चौधरी,अमोल पटेल,शिवम पांचाळ,माजिद शेख,मतीन खान,परविन मैत्रे, मुनीर भाई खिचडीवाले, अनेक नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी टिपू सुलतान जयंती कमिटी आयोजक शेख उस्मान, जयंती कमिटीचे अध्यक्ष पत्रकार मोसिन खान, सेफ चाऊस, आकाश मोटे, मोसिन अन्सारी, शकील शेख, महमूद शेख, अनिस शेख, आमेर खान, असद शेख, सुनील आडे, असेफ शेख, वासिम शेख, मोईझ अन्सारी, अब्बास शेख, मोहम्मद शेख, शकील शेख, इरफान शेख, हुसेन शेख, अहमद शेख, इरफान शेख आदींनी परिश्रम घेतले तरी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद इस्माईल यांनी केले तर आभार जयंती कमिटीचे अध्यक्ष पत्रकार मोसिन खान यांनी मानले