विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव खं. येथे भौतिकशास्त्र या विषयावरील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय वेब परिषदेचे यशस्वी आयोजन

38

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.29नोव्हेंबर):-ग्रामीण भागात कार्यरत असूनही अल्पावधीत नावलौकिक मिळविलेले विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती तर्फे भौतिकशास्त्र या विषयावर मागील वर्षीपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे तसेच विविध देशांमधून व भारतातील नामांकित विद्यापीठांमधून व संस्थांमधून तज्ञ संशोधकांचे मार्गदर्शन संशोधन कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावे हा हेतू ठेवूनयावर्षी सुद्धा महाविद्यालयातर्फे भौतिकशास्त्रातील “अँडव्हांस मटेरियल सायन्स अँड नँनोटेक्नोलॉजी” या विषयावर दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले .

दि. २३ ते २५ नोव्हेंबरया दरम्यान, तीन दिवस चाललेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेचा उद्घाटन सोहळा दि. २३ नोव्हेंबर ला सकाळी दहा वाजता पार पडला. यासाठी उद्घाटक म्हणून वरिष्ठ प्राध्यापक मा.डॉ. कमलाकर जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, तसेच प्रमुख अतिथी म्हणून आय ई सी विद्यापीठ सिमला हिमाचल प्रदेशचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉ. महावीर सिंग यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका भिसे, तसेच उद्घाटनासाठी महाविद्यालयाच्या आयक्यूएसी समन्वयक डॉ. सुचिता खोडके, परिषदेचे आयोजन सचिव व भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनंत वडतकर व परिषदेचे संयोजक डॉ. प्रशांत खरात, व समन्वयक प्रा.अजय अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर परिषद ही दुसऱ्यांदा ऑनलाईन मध्यमावरून घेण्यात आली.

या तीन दिवसीय परिषदेसाठी देशातील तसेच जगभरातील ०७ देशातून एकूण १३प्रमुख मार्गदर्शक लाभले असून यामध्ये प्रोफेसर डॉ. कमलाकर जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, डॉ. एस. एम. युसुफ, संचालक, भौतीकशास्त्र विभाग, भाभा आटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई व वरिष्ठ प्राध्यापक होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई, प्रोफेसर डॉ. महावीर सिंग सिमला हिमाचल प्रदेश,प्रा. सागर सिरसाठ, साउथ वालेस विद्यापीठ केनसिंग्टन, सिडनी ऑस्ट्रेलिया,डॉ. प्रसाद फडणीस भाभा आटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई, प्रा. डॉ. विनायक परळे, मटेरियल सायन्स विभाग योन्सेई विद्यापीठ, दक्षिण कोरिया,डॉ. संदीप वाघुळे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, डॉ. आनंद शिंदे मेडिसिनल केमेस्ट्री कंसास विद्यापीठ कंसास, अमेरिका,डॉ. अनुराग रॉय,एक्शीटर कॉर्न्वाल, इंग्लंड,डॉ. अविनाशकुमार चौरसिया, गोथेन्बर्ग विद्यापीठ, स्वीडन,डॉ. प्रभातकुमार दुबे, पिसा विद्यापीठ, इटली,डॉ. टी.थेवसान्थी, आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कलासालीन्गम विद्यापीठ, क्रिश्नकोइल, तामिळनाडू,डॉ. नितीन बनसोड अमरावती. आदी तज्ञ मार्गदर्शक परिषदेस लाभले होते. या परिषदेसाठी ११ देशांमधून एकूण १०८ शोधनिबंधांची नोंदणी झाली होती व यासाठी एकूण २८७ सहभागींनी आपलीनोंदणी केली होती.

विशेष म्हणजे भारतातील जवळपास सर्वच राज्यांमधून या परिषदेस संशोधकांनी आपला सहभाग नोंदविला. हे सर्व सहभागी पोस्टर व प्रत्यक्ष सादरीकरणाच्या माध्यमातून आपले संशोधन मांडले. या परिषदेत विशेष व्याख्यानांचे १३ तांत्रिक सत्र, संशोधकांची सादरीकरणेझूम व युट्युब च्या माध्यमातून ऑनलाइन प्रसारीत करण्यात आली.या परिषदेचा समोराप दि. २५ नोव्हेंबर सायंकाळी ०४ वाजता पार पडला. यासाठी ऑनलाईन पद्धीतीने प्रमुख अतिथी सहभागी झाले होते.

समारोपीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य. डॉ. अलका भिसे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून, जेष्ठ प्राध्यापक डॉ. कमलाकर जाधव, प्राध्यापक डॉ. संदीप वाघुळे, प्राध्यापक डॉ. टी. एस. वासनिक, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता समितीच्या समन्वयक प्रा. डॉ. सुचिता खोडके, परिषदेचे आयोजन सचिव डॉ. अनंत वडतकर, परिषदेचे संयोजक डॉ. प्रशांत खरात, व समन्वयक प्रा.अजय अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथी, प्राध्यापक डॉ. कमलाकर जाधव व प्राध्यापक डॉ. संदीप वाघुळे यांनी परिषदेच्या विषयावर मार्गदर्शन केले तसेच, या परिषदेस लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद व लाभलेले उत्कृष्ट नामवंत वक्ते ही या परिषदेची जमेची बाजू असून, उत्कृष्ट आयोजनामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने आयोजित केलेली ही परिषद यशस्वी झाल्याचे मत प्रमुख अतिथींनी व्यक्त केले.