भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चैरिटेबल ट्रस्ट गंगाखेड व नारायण सेवा संस्थान उदयपूर (राजस्थान) यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत विशाल दिव्यांग तपासणी शिबिर

  37

  ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधि)

  गंगाखेड(दि.9डिसेंबर):-“इवलेसे रोप लावियेले द्वारी*
  *त्याचा वेलू गेला गगनावरी*!”

  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या संत विचारधारा प्रमाणे एक छोटासा प्रयत्न,श्री संत जनाबाई यांच्या पावन जन्मभूमीत स्वर्गीय कैलासवासी भोलारामजी कांकरिया यांच्या 45 व्या स्मृतिप्रीत्यर्थ दिव्यांगाच्या जीवनात सुरुवातीची मांदियाळी यावी म्हणून भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चैरिटेबल ट्रस्ट गंगाखेड व नारायण सेवा संस्थान उदयपूर (राजस्थान) यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत विशाल दिव्यांग तपासणी शिबिर व कृत्रिम अवयव मापन शिबिर दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी रविवारी सकाळी 9 वाजता पूजा मंगल कार्यालय, गंगाखेड येथे आयोजित करण्यात आले आहे.

  *” तथा सत्कर्मी रती वाढो”* वारकरी संप्रदायातील माझ्या वडिलांच्या स्वप्नातील दिव्यांगाच्या जीवनातील एक सुंदर पहाट यावी म्हणून एक छोटसं लावण्याचा संकल्प *माननीय जिल्हाधिकारी परभणी आँचलजी गोयल* यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात येत आहे. तसेच रुग्णांसाठी शिबिरात covid-19 प्रतिबंधात्मक लस देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात प्रथम नाव नोंदणी करून मोफत तपासणी व कृत्रिम अवयवाचे माप घेण्यात येईल नंतर संबंधितास अवयवासाठी पुन्हा बोलावून वाटप करण्यात येईल. त्यासाठी निवड झालेल्या रुग्णांची ठरवून दिलेल्या दिनांकास उदयपूर येथे मोफत ऑपरेशन करण्यात येईल. येताना रुग्णांनी आपल्या आधार कार्डची सत्यप्रत (झेरॉक्स), दिव्यांग भागाचे दोन फोटो सोबत आणावे.

  शिबीर स्थळ:- पूजा मंगल कार्यालय गंगाखेड
  वेळ सकाळी 9 वाजेपासून
  दिनांक 12 डिसेंबर 2019 रविवार संपर्क क्रमांक *7888031514* तरी परिसरातील गरजूंनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान बीकेबीसी ट्रस्टच्या सचिव मंजुषा ताई दर्डा यांनी केले आहे.