ओबीसी आरक्षण रद्द केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन व निदर्शने करून राज्यपालांना निवेदन सादर

34

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.10डिसेंबर):-भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र धरणे आंदोलन व निदर्शने करून तहसीलदार कोरपना यांच्यामार्फत राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले श्री नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले प्रमुख उपस्थिती श्री शिवाजीभाऊ शेलोकर माजी जिल्हा उपाध्यक्ष,श्री पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष, जगदीश पिंपळकर शाखा अध्यक्ष,श्री दिनेश खडसे युवा मोर्चा कार्यकर्ता आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात माहा विकास आघाडी सरकारने ओबिसी इंमपेरिकल डेटा व इतर कागदपत्रे सुप्रीम कोर्टात वेळेवर सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाबाबत कोणतेही कागदपत्र सादर न केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण साहा डिसेंबर 2021 ला रद्द केले आहे व त्यातच निवडणुका घोषित झालेल्या आहे ओबीसी आरक्षणाला डावलुन निवडणूक घेण्यात येत आहे हा सरासरी ओबीसी बांधवांवर झालेला अन्याय आहे सरकारला विनंती करतो की इंपेरीकल डेटा व कागदपत्रे सादर करावे व ओबीसी आरक्षण लागू करावे अन्यथा याही पेक्षा मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्री नारायण हिवरकर यांनी दिला कार्यक्रमाचे संचालन जगदीश पिंपळकर यांनी केले तर आभार दिनेश खडसे यांनी मानले