लग्नाचा व मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवचरित्र भेट…

28

🔹शिवचरित्र आमच्या परिवारासाठी ऊर्जास्रोत – लक्ष्मणराव पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.11डिसेंबर):- काल जळगांव (अयोध्या नगर) येथे आमच्या सासऱ्यांकडे वास्तुशांती ची पूजा होती. काल आमच्या वैवाहिक आयुष्याला १२ वर्ष पूर्ण झाली व १३ व्या वर्षात पदार्पण केले. तसेच आमचा लाडका मुलगा चि. विवेक ११ वर्ष पूर्ण होऊन त्याने १२ व्या वर्षात पदार्पण केले.जीवनातील अनेक चढउतार अनुभवल्यानंतर वैवाहिक आयुष्याचा एक तप पूर्ण होण्याचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवला. काल जळगांव येथे लग्नाचा १३ वा वाढदिवस व मुलाचा १२ वा अतिशय उत्साहात साजरा झाला.

आमचे मामा (सासरे) श्री. कृष्णा शंकर पाटील, सौ. रेखा कृष्णा पाटील व चि. दिनेश कृष्णा पाटील यांनी मला व माझ्या पत्नीला “रयतेचा राजा शिवछत्रपती” हा ग्रंथ भेट दिला तसेच माझा मुलगा विवेकला “श्यामची आई” हा ग्रंथ भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ भेट देऊन व केक कापून कॉलनी परिसरातील सर्व मान्यवर आणि मित्र परिवाराच्या वतीने सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. याप्रसंगी माझ्या लहान भावाप्रमाणे असलेला माझा शालक दिनेश याने व आमच्या सक्सेस करियर मार्गदर्शक प्रबोधिनी चे संचालक व आमचे मार्गदर्शक प्रा. गुलाबराव पाटील सर यांचे भाचे व माझे देखील भाचे सागर दादा आणि दादू भैय्या यांनी १ नव्हे तर ३ केक आणले.

दरवर्षी पप्पू दादा, सागर, जयेश (दादू), दिनेश व मित्र परिवार माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी धरणगाव ला न चुकता येतात आणि त्यांची प्रेमाची अनोखी भेट मला देतात. यावर्षी जळगांव (सासुरवाडी) मध्ये हा योग घडून आला. यानिमित्ताने पत्नी सौ. ज्योती, बहीण रुपाली, मुलगा विवेक, मुलगी निधी तसेच मामांचा परिवार, कॉलनीतील तळेले परिवार, पाटील परिवार (पष्टाणे), जैन परिवार, पाटील परिवार (पाथरी), पारोळा येथील पुरोहित मंडळी तसेच सर्व मित्र परिवार उपस्थित होते.