उमरी शहरात अनाधिकृत क्लासेसचा बाजार-शिक्षणाचा खेळखंडोबा

34

🔸चौकशी करुन कार्यवाही करा अन्यथा तिव्र आंदोलन करु – छावा प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे

✒️उमरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरी(दि.10डिसेंबर):- कोरोना महामारीमुळे शाळा बंद होत्या आता शासन निर्बंधानुसार काही महिन्यापासून चालु झाल्या आहेत, आणी शाळेबरोबरच खाजगी क्लासेसनी सुद्धा धुमाकूळ घातला आहे….उमरी शहरात बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येत असतात त्यामध्ये जास्तीचे विद्यार्थी हे शेतकरी व मजूर कुटुंबातून येतात. सततच्या नापीकीमुळे शेतकरी राजा होरपळून निघालेला असताना सुद्धा मुलांच्या भवितव्यासाठी खाजगी शिकवणी चालु करतात परंतु सध्या शहरात या क्लासेसचा सुळसुळाट झाला असुन विद्यार्थ्यांकडून अति प्रमाणात लुट होत आहे.एवढेच नाही जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले सहशिक्षक सुद्धा अमाफ फि घेत क्लास चालु केले आहेत याकडे मात्र संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत.

हे सर्व उघड चालु असताना कार्यालयातील अधिकारी झोपेत आहेत का…? असे प्रश्न जनतेत निर्माण होत आहेत.या संदर्भात राजेश मोरे यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालया पत्रव्यवहार केला होती परंतु गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातून कोणतेही लेखी उत्तर न मिळाल्याने या कार्यालयाचीही मिलीभगत असल्याची तुफान चर्चा चालु आहे.कोणत्याही प्रकारची डिग्री घेउन कोणीही क्लास चालु करुन विद्यार्थ्यांकडून अमाप फी घेत आहेत याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी दिला आहे….