नाशिक शहरातील भद्रकाली परिसरातील दीडशे वर्षांपूर्वीचा कुंटणखाना अखेर सील, पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांचे नागरिक,यांनी मानले आभार

30

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.11डिसेंबर):-भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्ली येथे तब्बल दीडशे वर्षापूर्वीचा कुंटणखाना अखेर पोलिसांनीअखेर सील केला . पोलिस कारवाई करत असताना येथील रहिवाशी महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता . पोलिसांनी समजूत काढल्यानंतर रहिवाशी महिला शांत झाल्या .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी विशेषतः धार्मिक स्थळ , शाळा महाविद्यालये , बाजारपेठ , बससस्थानके , शासकीय खासगी दवाखाने , रेल्वे स्थानक आणि हॉटेल परिसराच्या २०० मीटरच्या परिसरात अनैतिक व्यवसाय, अवैध धंदे करण्यास बंदी घातली होती . तसेच शहरातील विविध भागातील चालू असलेल्या कुंटणखान्यांची माहिती शहरातील पोलिस ठाण्यांकडून मागवली होती . भद्रकाली परिसरातील ठाकरेगल्ली भागात काही घरांमध्ये बेकायदेशीररीत्या कुंटणखाना सुरू असल्याचा अहवाल भद्रकाली पोलिसांनी पोलिस आयुक्तांना पाठवला होता . हा कुंटणखाना बंद करण्यासाठी संबंधित रहिवाशांना नोटीस देण्यात आली होती .

मात्र रहिवाशांनी नोटिसीला प्रतिसाद न दिल्याने पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांनी संबंधित कुंटणखाना सील करण्याचे आदेश भद्रकाली पोलिसांना दिले . त्यानुसार गुरुवारी ( दि . ९ ) दुपारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पंवार , पोलिस निरीक्षक दीपक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर खांडवी , प्रणिता पवार , जितेंद्र माळी यांच्यासह पोलीस पथकाने गजबजलेला कुंटणखाना सील केला . तेथील रहिवासी महिलांना घरातील सामान बाहेर काढण्यासाठी वेळ देण्यात आला होता . परीसरातील अनेक व्यावसायिकांनी पोलिस खाते यांचे मानले आभार,. दीडशे वर्षांपासून हा कुंटणखाना सुरू होता . आंबट शौकिन , गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी येत होते . खुनासारखे गंभीर गुन्हे घडले असल्याने येथील पारंपरिक व्यावसायिक त्रस्त झाले होते . काही तर मालमत्ता विक्री करून दुसरीकडे स्थलांतरित झाले होते.अखेर पोलिसांनी हा कुंटणखाना सील केल्याने अनेक व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले .