नाशिक शहरातील अखेर सात पोलिस ठाण्यांना मिळाले वरिष्ठ निरीक्षक

24

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.11डिसेंबर):- शहर पोलिस आयुक्तालयातील अंतर्गत भद्रकाली पोलिस ठाणे , सरकारवाडा पोलिस ठाणे , इंदिरानगर पोलिस ठाणे, म्हसरुळ पोलिस ठाणे , देवळाली कॅम्प पोलीस ठाणे , सातपूर पोलिस ठाणे , या सात पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांना सहायक आयुक्तपदी बढती मिळाल्याने या सहा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांचे पदे रिक्त झाले होते . या रिक्त जागेवर पोलिस आयुक्त साहेब दिपक पांडेय यांनी वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती जाहीर केली . नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे 

पोलिस आयुक्त दिपक पांड्ये यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्याय देत पारदर्शक बदली प्रक्रिया राबवत पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी वर्णी लावली होती . या मध्ये भद्रकाली पोलिस ठाण्यात संभाजी निंबाळकर , सरकारवाडा पोलिस ठाण्यात सुनील जाधव , सातपूर पोलिस ठाण्यात किशोर मोरे , म्हसरुळ पोलिस ठाण्यात भारतकुमार सूर्यवंशी , इंदिरानगर पोलिस ठाण्यात श्रीपाद परोपकारी यांना पोलिस ठाण्याची धुरा दिली होती . या अधिकाऱ्यांनी अल्पवधीत आपल्या कामाची चुणूक दाखवत आयुक्तांच्या विश्वासास पात्र ठरले होते .

या अधिकाऱ्यांना सहायक आयुक्तपदी बढती मिळाल्याने आता रिक्त जागांवर कोणत्या अधिकाऱ्यांची वर्णी लागेल याकडे पोलिसा सह नागरिकांचे लक्ष लागले होते अखेर बुधवारी वरिष्ठ निरीक्षकांची वर्णी लागली आहे म्हसरुळ पोलिस ठाणे – अशोक साखरे , भद्रकाली पोलिस ठाणे- दत्ता पवार , मुंबई नाका पोलिस ठाणे सुनील रोहोकले , सरकारवाडा पोलिस ठाणे – साजन सोनवणे , सातपूर पोलिस ठाणे – महेंद्र चव्हाण देवळाली कॅम्प पोलीस ठाणे – कुंदन जाधव , इंदिरानगर पोलिस ठाणे संजय बांबळे आदी नी कार्यभार स्वीकारला आहे