सी पी सी पुस्तक वाचतांना मला दिसले ॲड.गजानन लासुरे!

30

सकाळी CPC चे पुस्तक वाचताना एक परिच्छेद वाचला. तेव्हा लगेचच मला ॲड.गजानन लासुरे यांची आठवण आली ती अशी,मुंबईतील एका नामांकित विद्यालयात इंग्रजी विषयास शिक्षक म्हणून एक उमदा उच्च शिक्षित तरूण नोकरीस लागला.पुढे अनेक वर्षे नोकरी झाल्याने नियमित होत पदोन्नतीमुळे विभागप्रमुख आणि नंतर मुख्याध्यापक बनले. देशाची नवीन पिढी घडवण्याच्या कामकाजात आपल्या विद्यालय पुढे असावे या ध्येयाने कामात खूप व्यस्त होते. विद्यालयाचे प्रशासकीय कामकाज सुरळीत व पारदर्शक व्हावे या दृष्टीने काही कडक शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला. सरांच्या विद्यालयातील या कामकाजाची सर्व स्तरातून स्तुती होत होती. हीच बाब जातीयवादी शिक्षक व मॅनेजमेंट ला खटकली.आणि सरांची वयोमानानुसार निवृत्त होण्याच्या एक वर्ष अगोदरच त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. सदर बाब मुख्याध्यापक सरांच्या जिव्हारी लागली. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांचे हेच फळ काय? सुरुवातीस त्यांनी चौकशी समितीच्या कामकाजासमोर जाण्याचे टाळले. नंतर आपली चूक सुधारून चौकशीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. आणि शेवटी चौकशी समिती ने सरांच्या विरोधात निकाल देऊन त्यांना कायमचे बडतर्फ केले.

पर्यायाने नाईलाजास्तव मुख्याध्यापक सरांनी School Tribunal Mumbai येथे धाव घेऊन चौकशी समितीच्या निर्णयावर अपिलात केस दाखल केली. या दरम्यान त्यांचे वकिल दुसऱ्यावर पार्टीशी संगनमत करून काम करीत असे. परिणामी केस चे कामकाज व्यवस्थित न होता विरोधात चालले होते. त्यांच्या वकिलाच्या कामकाजावरती विश्वास नसल्यामुळे सरांनी सामनेवाल्या पार्टीशी संगनमत न करणार्या आणि प्रामाणिकपणे काम करणार्या वकिलाचा शोध सुरू केला. तेव्हा सरांच्या एका दुसऱ्या वकील मित्राच्या सांगण्यावरून ॲड.गजानन लासुरे यांना भेटले. वरकरणी केस खूप मजबूत वाटत असली तरी कागदोपत्री मात्र केस कमजोर झाल्याचे जाणवल्यामुळे ॲड.गजानन लासुरे यांनी सदर केस घेण्याचे टाळले होते. त्यांच्या याच बाबींवर सरांचा विश्वास बसला आणि निकाल काय होईल तो चालेल परंतु सदर केस आपण चालवावी असे आग्रह करून त्यांना विनवून केस चालविण्यासाठी नेमले.

ॲड.गजानन लासुरे यांनी केसचा व प्रत्येक कागदपत्राचा सखोल, बारकाईने अभ्यास केला. त्यावरून अनेक बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या. सदर केस मध्ये चौकशी समिती पुढे पुरावा म्हणून जोडलेले ३०-३५ दस्ताऐवजांची यादी होती. उपरोक्त सर्व दस्ताऐवज मे. कोर्टासमोर सादर करण्याचा अर्ज ॲड.गजानन लासुरे यांनी केला. यामुळे समोरच्या पार्टीची मोठी समस्या झाली आणि मुंबईच्या पावसात दस्ताऐवज गहाळ झाले असे कारण देऊन वेळ मारून नेली. ॲड. लासुरे यांनी पुन्हा दुसरा पवित्रा घेऊन उपरोक्त यादीपैकी वास्तवात फक्त १५-२०च दस्ताऐवज चौकशी समिती समोर आले होते अशा आशयाचा अर्ज मे. कोर्टासमोर सादर केला. आता मात्र सामनेवाली पार्टी समोर अवघड परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पर्यायाने सामनेवाली पार्टीने फक्त ८-१० दस्ताऐवज मे. कोर्टासमोर सादर केला.

याचाच फायदा घेत ॲड.गजानन लासुरे यांनी पुन्हा एक अर्ज मे.कोर्टासमोर सादर केला कि, चौकशी समिती समोर पुरावा म्हणून जोडलेले ३०-३५ दस्ताऐवजांची ऐवजी फक्त ८-१० दस्ताऐवज मे.कोर्टासमोर आले असल्याने उर्वरीत सर्व दस्ताऐवज खारीज करून पुरावा म्हणून वापर करू नयेत.यासर्व प्रकारात एक वर्ष केव्हा गेले समजलेच नाही. ॲड.गजानन लासुरे यांनी सादर केलेला दोन्ही अर्ज मे.कोर्टाने निकाली काढले आणि युक्तीवाद सुरू झाला.
ॲड.गजानन लासुरे यांनी मे.कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले कि,अपिल पक्षकार हे वंचित घटकातील हुशार,मेहनती,प्रामाणिकपणे नियमांना धरून काम करीत होते. त्यांच्या वयोमानानुसार निवृत्त झाल्यानंतर काही फायदे मिळू नयेत या जातीयवादी मानसिकतेमुळे त्यांना एक वर्ष अगोदरच गैरहेतून सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यासाठी सामनेवाली पार्टी ने कर्मचार्यांच्या मदतीने खोटी कागदपत्रे तयार केली होती. विद्यालय मॅनेजमेंट कमिटीने चौकशी समिती कायद्याला धरून गठित केली नव्हती. चौकशी समितीने निपक्षपाती भूमिका पार पाडली नाही. अशा प्रकारच्या अनेक बाबी मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि आपली न्याय मागणी लावून धरली. शेवटी ॲड.गजानन लासुरे केस जिंकले आणि त्यांनी मुख्याध्यापक सरांना त्यांचा हक्क मिळवून दिला.

सी पी सी CPC चे पुस्तक वाचताना त्यातील एका परिच्छेदानुसार ॲड.गजानन लासुरे यांनी लढलेली संपुर्ण केस माझ्या समोर उभी राहिली. ॲड.गजानन लासुरे यांनी मे. कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले कि, Respondent ने खोटी कागदपत्र तयार केली आहेत आणि he has ulterior motive in not producing the said documents. याच मुद्द्याला अधोरेकित करीत त्याच्या आधारे School Tribunal ची केस जिंकली. तेव्हा आपल्याला कायद्याच्या तरतुदींसह व केसचा अभ्यास किती महत्वाचा असतो हे सिध्द होतो. बहुजन समाजाच्या चळवळीत किर्याशील असणारे वकील फार असतात.पण लक्षवेधी काम करणारे कमी असतात.त्यामुळे ॲड.गजानन लासुरे यांची आठवण झाली आणि त्यांच्या बद्दल आमच्या मनातील आदर आणखीच वाढला.

✒️भारत काळे(मुंबई)मो:-९८६७२८४४४८