भारतीय बौद्ध महासभा दारव्हाच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

31

🔸धम्मयान दिनदर्शिकेचे वितरण

✒️दारव्हा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

दारव्हा(दि.13डिसेंबर):- दिनांक १२डिसेंबर रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय महासभा तालुका शाखा दारव्हा यांच्या वतीने सिद्धार्थ नगर येथील सम्यक संकल्प बुध्दविहारा मध्ये सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दारव्हा च्या वतीने तालुका अध्यक्ष प्रा.सिद्धार्थ गायकवाड सर आणि सटवाजी कांबळे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी सचिव डॉ.प्रशांत बागेश्वर सर यांनी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच प्राध्यापक सिद्धार्थ गायकवाड सर यांनी बाबासाहेबांचा परिवार आणि बाबासाहेबांचे संघटन विषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने उपस्थित बांधवाना धम्मयान या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी सूत्रसंचालन प्रा. अरविंद मनवर यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शालिग्राम गवई सर , डॉ.दिलीप बरडे सर, कोषाध्यक्ष डी.वाय खडसे सर , बोदडे सर, गोंडाने सर , महेन्द्र अगमे सर, ,विजयराव गजभिये, राजूभाऊ मनवर, भाऊराव चक्रे, नारायणराव खडसे, बौद्ध उपासिका व उपासक उपस्थित होते.