कामावर हजर राहण्याची एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी..!

31

🔹अन्यथा कठोर कारवाई करण्याची शासनाची तंबी

✒️आनंद टेकुळे(प्रतिनीधी परभणी)मो:-8830970125

परभणी(दि.13डिसेंबर)एसटी कर्मचारी नियमाबाहेर पद्धतीने आंदोलन करत आहेत.त्यामुळे कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.आशा कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी एसटी महामडळाकडून शेवटची संधी देण्यात आली आहे.सोमवारी 13 डिसेंबर पर्येंत कामावर हजर राहण्यास मुभा दिली आहे.जे कर्मचारी हजर राहणार नाहीत आशावर कठोर कारवाई केली जाणार अशी तंबी एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकाकडून देण्यात आली आहे.एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री येंच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार 10 डिसेंबर रोजी बैठक पार पडली आहे.

जे कर्मचारी 10 डिसेंबर पर्येंत नियमाबाहेरत्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत त्यानां मानवतावादी कर्तव्यावर हजर राहण्यासाठी येतील अशा कर्मचाऱ्यांना सोमवारी 13 डिसेंबर पर्येंत हजर राहण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.मात्र असे असले तरी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम असून जोपर्येंत एसटी शासनाचे विलनीकरण होत नाही तोपर्येंत आंदोलन करणार असल्याचा पावित्रा घेतला आहे .तर दुपारीकडे सोमवारी हजर राहण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.त्यानुसार हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात यावे.

ज्या कर्मचाऱ्यावर निलांबनाची करण्यात आली आहे त्या कर्मचारी हजर झाल्यानंतर निलबानाची कारवाई मागे घ्यावी .निलंबन मागे घेताना जे आगार 50 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक क्षमतेने सुरु असतील अशा आगरामध्ये कर्मचाऱ्याला हजर करून घेतले जाणार आहे.सोयीसाठी जवळच्या आगरामध्ये हजर करून घ्यावे अशी सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानंतरही जे कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत अशावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.