धामणगाव येथे यशोदा हॉस्पिटल आणि धामणेश्वर मेडिकलचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित संपन्न

38

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

धामणगाव(दि.14डिसेंबर):-येथे यशोदा हॉस्पिटल आणि धामणेश्वर मेडिकलचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे सर्व सेवा सुविधांनी युक्त अशा यशोदा हॉस्पिटल व प्रसूती गृह आणि धामणेश्वर मेडिकल अँन्ड जनरल स्टोअरचा शुभारंभ विविध क्षेत्रातील मान्यवर संत,महंत आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत रविवार दिनांक १२ रोजी सकाळी पार पडला.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना इंपल्स हाँस्पिटलचे संचालक डॉ.संदीप गाडे म्हणाले की,आरोग्याच्या सुविधा काही आजारांसाठी तात्काळ व योग्य मिळणे गरजेचे असते.

काही रुग्णांना दोन तासात,चार तासात उपचार होणे गरजेचे असते,मात्र ज्या ठिकाणी सुविधा आहेत तिथपर्यंत रुग्ण घेऊन जाण्यासाठी वेळ लागतो.अशावेळी जो प्राथमिक उपचार मिळतो तो महत्त्वाचा आहे.यासाठी प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर,तज्ञ असणे आवश्यक आहे.कोणत्याही रुग्णांवर तातडीने योग्य उपचार करण्याचे काम श्री व सौ तरटे हे करतील याची मला खात्री आहे म्हणूनच यशोदा हाँस्पिटल या परीसररातील रुग्णांसाठी आधार ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच शिंदे मामा होते.

यावेळी ह.भ.प.रघुनाथ महाराज धामणगावकर,ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,ह.भ.प.शिंदे महाराज,मेडप्लस अहमदनगरचे संचालक मूळचे आष्टीचे डॉ.धनंजय वारे,सभापती बद्रीनाथ जगताप,माजी जि.प.सदस्य विजय गोल्हार दुध संघाचे अध्यक्ष संजय गाढवे,शिवाजी नाकाडे,अमोल तरटे,रावसाहेब लोखंडे,सरपंच सौ.शितल अमोल चौधरी,माजी सभापती रमजान तांबोळी,बाळासाहेब निकम,बाळासाहेब चौधरी,मनोज गाढवे,सरपंच बंडू तळेकर,भागचंद झांजे,पत्रकार अंकुश तळेकर,संतोष ससाणे,एम.बी,तळेकर,एस.पी.तळेकर,गोवर्धन तळेकर,ढोबळे मामा,डॉ.शेंडगे,डॉ.मोहरकर,डॉ.सौ.सानप,डॉ.नाथ पांडूरंग झिंजुर्के आदी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री व सौ तरटे यांनी केले.

यावेळी विजय गोल्हार,बद्रीनाथ जगताप,बबन महाराज,शिंदे महाराज,रघुनाथ महाराज यांनी नविन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आदर्श शिक्षक सुनिल तरटे,संजय तरटे,आशोक झिंजुर्के,डॉ.सागर तरटे,डॉ सुचारीता तरटे,तळेकर,केतन झिंजुर्के यांनी केले.सर्वाचे आभार सुनिल तरटे यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवी दिनेश पोकळे यांनी केले,यावेळी धामणगांव व घाटापिंपरी येथील ग्रामपंचायतचे आजी,माजी पदाधिकारी,सर्व डॉक्टर,व्यापारी,ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.