भाजपा शिक्षक आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18डिसेंबर):-दिनांक 16 डिसेंबर रोजी भाजपा शिक्षक आघाडी च्या पदाधिकारी व सदस्यांनी दहावी, बारावी वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या स्थायी निगरानी पथकातील नेमणूका रद्द कराव्यात या मागणीचे निवेदन तहसीलदार गंगाखेड यांना दिले. इयत्ता दहावी व बारावी या वर्गाचे ऑफलाइन तास सुरू होऊन साधारण एक महिन्याचा कालावधी झाला असून या दोन्ही वर्गाच्या बोर्ड परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे बोर्डाने नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे संबंधित वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिशय कमी कालावधी मिळाला आहे.

त्यातच गटशिक्षणाधिकारी व तहसील कार्यालय या स्तरावरून या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना स्थायी निगराणी पथकामध्ये नियुक्ती दिल्यामुळे अध्यापनाचे काम खंडीत झाले आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या बाबीचा विचार करून या वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना या पथकातून वगळण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हा सहसंयोजक राजपाल दुर्गे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोपाळ मंत्री, तालुका संयोजक हनुमंत साळवे,, संघटक अनंत काळे, सदस्य विजय बेरळीकर, प्रताप शीसोदे, मंगेश रेवणवार, श्रीपाद जोशी, भागवत गायकवाड, प्रताप खैरे, अभिजित अष्टेकर, राजलिंग मठपती, गणेश सातपुते, बालासाहेब सातपुते आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.