दहावी बारावीचं वेळापत्रक जाहीर

74

🔸यावर्षी परीक्षार्थींना कोरोनाची ” हमारे जींदगी मे आके हमे गले लगाके, बैठा दिया पलक पे हमे ख्वाब से जगाके” याप्रमाणे साथ लाभणार नाही

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.18डिसेंबर):-परीक्षा हे नाव ऐकलं की, काहींच्या मनात आनंद व उत्साह असतो, तर काहींच्या मनात भितीचं वातावरण असतं. ज्यांचा अभ्यास झालेला नसतो त्यांच्या मनात भितीने घर केलेलं असतं. परंतु अभ्यास केला तर भिती बाळगण्याचं काहीच कारण नसतं. त्यामुळे सर्व परीक्षार्थीना या वर्षी जोमाने अभ्यास करण्याची गरज आहे. मागिल वर्षाप्रमाणे यावर्षी त्यांचा मित्र कोरोनाची ” हमारे जींदगी मे आके हमे गले लगाके, बैठा दिया पलक पे हमे ख्वाब से जगाके” याप्रमाणे साथ लाभणार नाही. त्या अनुषंगाने राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात एका व्हिडीओच्या माध्यमातून घोषणा केली आहे. 12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर 10 वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचं आणि शाळांना त्यांच्या अभ्यासक्रमाचं नियोजन करणं शक्य होणार आहे.
या परीक्षेसंदर्भात माहिती देतांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “ओमायक्रॉनबाबत आपण मॉनिटरिंग करत आहोत.” पण १०वी आणि १२वी ही विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची वर्ष असतात. या परीक्षा कधी होणार अशी विचारणा होत होती. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान कोरोना काळात परीक्षांचं स्वरूप आणि मूल्यमापनाच्या पद्धती यामध्ये बदल करण्यात आला होता. त्यासंदर्भात आता त्याविषयी काय पद्धत असेल, याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. त्यावर देखील वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

“मागील काळात जशी ऑफलाईन परीक्षा होत होती, तशीच आता होणार आहे. पेपर पॅटर्न आणि मूल्यमापन देखील तशाच स्वरूपाचं असेल”, असं देखील त्यांनी सांगितलं.तसेच त्यांनी आपल्या ट्विटरवरून 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतील, याविषयी देखील माहिती दिली आहे. 12वीचा निकाल जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तर 10वीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लावण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.