अनाथ,दिव्यांग,निराधार विद्यार्थ्यांना मोफत तर इतर विद्यार्थ्यांना सवलतीत प्रशिक्षण

37

🔹अहमदनगर येथील राजमुद्रा अकॅडमी व प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.18डिसेंबर):-मागील १२ वर्षापासून राजमुद्रा अकॅडमीच्या संस्थापिका अध्यक्षा नंदाताई विनायक पांडूळे यांच्या मार्गदर्शनाखाली २०० च्या पार विद्यार्थी वेगवेगळ्या शासकीय पदावर कार्यरत आहेत.अहमदनगर येथील सिद्धी बाग समोर विद्यावैभव,न्यू आर्टस काॅलेज समोर हे प्रशिक्षण केंद्र असून याच संस्थेचे आपल्या बीड जिल्ह्यात ही याच प्रमाणे कार्य करायचे आहे.अनाथ निराधार मुलांना आर्थिक अडचणी मुळे प्रशिक्षण मिळत नसल्याने इच्छा अपेक्षा असुन न ही विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठता येत नाही यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.राजमुद्रा अकॅडमीच्या संस्थापिका अध्यक्षा नंदाताई पांडूळे यांच्याकडून अनाथ,दिव्याग,निराधार विद्यार्थांना मोफत व इतर विद्यार्थ्यांना इतर सर्व सवलतीच्या दरात पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा तयारी करून प्रशिक्षण दिले जात आहे.याचा लाभ आष्टी तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील विद्यार्थांनी घ्यावा असे आवाहन अकॅडमीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील मुला मुलींना शहराच्या ठिकाणी भरतीची तयारी करण्यासाठी राहणे व प्रशिक्षण घेणे परवडणारे नसणार म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलिस,आर्मी,बॅक,स्पर्धा परीक्षा तयारी करण्याची इच्छा असते.परंतु अडवे येते ते अठरा विश्व असलेले दारिद्रय या नवतरुणांनी आता खचुन न जाता त्यांची समस्या लक्षात घेऊन राजमुद्रा अकॅडमीमध्ये अनाथ,दिव्याग व निराधार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण इतर विद्यार्थ्यांना सवलत दिली जात आहे.सर्व सुविधा यामध्ये दिल्या जात असल्याने आपल्या बीड जिल्ह्यात याच प्रमाणे कार्य करायचे आहे.इच्छा असूनही विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठता येत नाही यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे तरी विद्यार्थ्यांसाठी राजमुद्रा अकॅडमी मध्ये प्रवेश दिला जात असुन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापिका अध्यक्षा नंदाताई विनायक पांडूळे यांनी केले असून यांचे नांदेड,यवतमाळ,अहमदनगर जिल्ह्यात कार्य सुरू असून त्यांना बीड जिल्ह्यातील विद्यार्थांसाठी हे कार्य करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी ७२१८८४६३७८९.या मोबाईल नंबर वर संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
———————————————-
राजमुद्रा अँकडमीमुळे पोलिस झाले – या अँकडमीमध्ये योग्य मार्गदर्शन मिळाले व प्रशिक्षण चांगल्या रित्या करुन घेतले जाते यामुळे मला यश संपादन मिळाले,शिक्षक वर्गांनी चांगल्या पद्धतीने शिकवले त्यामुळे राजमुद्रा अँकडमीमुळे पोलिस म्हणून नोकरी मिळाली.
– कु. किरण दयाराम राठोड – अहमदनगर पोलीस
———————————————-
अँकडमीमुळे यश संपादन झाले – या अकॅडमीमध्ये योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण करुन घेत असल्याने १०० टक्के भरती होण्याची हमी देण्यात येत आहे.भरतीचे प्रशिक्षण,ग्राउंड व कसरत करून घेण्यासाठी अनुभवी स्टाप असल्याने मला यश संपादन झाले
– कु.सविता अर्जुन ढोले – बीड पोलिस