अंगावर पेट्रोल ओतून घेताच बँकेने कर्ज मंजुरीचे पत्र दिले

35

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.21डिसेंबर):-व्यवसायासाठी एसबीआय बँक कर्ज देत नसल्याने वैतागलेल्या एका व्यक्तीने दुपारी बँकेसमोर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सदरील व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान या वेळी पोलिसांनी बँक कर्मचार्‍यांशी चर्चा घडवून आणली. यात बँकेने तात्काळ कर्ज प्रकरणाला मंजूर दिली. खापर पांगरी येथील शेख रसूल खाजामियॉ यांनी एसबीआय बँकेकडे व्यवसाय करण्यासाठी कर्ज प्रकरण दाखल केले होते. तीन वर्षापासून ते बँकेत खेटे घालत आहेत. बँक त्यांना कर्ज देत नसल्याने वैतागून त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

शेख रसूल यांनी बँकेसमोर स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान शेख रसूल यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने बँक परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन बँकेच्या कर्मचार्‍यांसोबत चर्चा घडवून आणली. यामध्ये काय तोडगा निघाला हे मात्र समजू शकले नाही.