रक्षा नगराळे कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित

32

🔸आपल्या लेखनीने जनमनावर प्रभुत्व

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.21डिसेंबर):-आजच्या धावपळीच्या जगात मानवाला समाजात आपलं एक वेगळं व्यक्तिमत्त्व उभं करण्यासाठी आपल्या अंगी एक तरी कलागुण विकसित करणे आवश्यक असते. या कलागुणांचा अविष्कार पण वेगळाच असतो. काहींच्या अंगी जन्मत:च असते, तर काहींच्या ते बदलत्या काळानुसार निर्माण होत असते. असं असतानाही काहींना आपल्यात काही तरी कलागुण असल्याचा भासस नसतो व ते वेगळ्याच कलागुणांच्या शोधात सदा भटकत असतात. ज्यांना भास होतो ते त्याची जाणीव ठेवून त्याच क्षेत्रात वाटचाल करत या समाजात एक अद्भूत असं आपलं स्थान निर्माण करतात. याच प्रतिभेची जाणीव ठेवून राळेगाव येथील माझी ताई रक्षा नगराळे ही साहित्य क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवत या समाज मनावर अविस्मरणीय अशी छाप पाडली आहे. त्यांचे साहित्य अनेक वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले आहे.

आजच्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून आपल्या सभोवताली घडणा-या घटनांचे वास्तविक दर्शन त्या आपल्या साहित्यातून समाजापुढे प्रकट करत असते. साहित्यासोबतच सामाजिक कार्यातही त्या सदैव अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल आजपर्यंत अनेक संस्थानी घेवून त्यांना सन्मानित केले आहे. याचीच प्रचिती म्हणून कलाविष्कार कला क्रिडा व बहुउद्देशिय संस्था भगोरा यांच्या मार्फत मुर्तिजापूर जि.अकोला येथे रविवारी घेण्यात आलेल्या पहिले भव्य राज्यस्तरीय कलाविष्कार संमेलनात त्यांना कोरोना योध्दा पुरस्काने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.सुरेश पाचकवडे सुप्रसिध्द ज्येष्ठ साहित्यीक, प्रा.डाॅ.संतोष हुसे समाजसेवक, मा.श्री.सम्राट डोंगरदिवे सभावती बांधकाम व शिक्षण विभाग जि.प.अकोला, मा.श्री.उमेश मसने कार्याध्यक्ष अ.भा.महात्मा फुले समता परिषद जि.अकोला, सिनेस्टार राहुल तायडे तहसिलदार मराठी चित्र.चालु द्या तुमचे फेम, मा.डाॅ.श्री.रमेश थोरात नाट्यकर्मी कच-या हिंदुस्थानी, सिनेस्टार दिप चहांदे कट्याळ काळजात घुसली फेम, मा.डाॅ.मनोहर घुगे सुप्रसिध्द साहित्यीक महा.राज्य.पुरस्कृत, सिनेस्टार सिमा जाधव साऊथ अभिनेत्री, सिनेस्टार कोमल भिसे अभिनेत्री लाल इश्क फेम हे उपस्थित होते. या प्रमुख मान्यवरांच्या व मा.श्री.गझलनवाज पं.भिमराव पांचाळे विशेष सत्कार मुर्ति. यांच्या उपस्थितीत आनंदमय वातावरणात हा सन्मान सोहळा पाड पडला आहे.