विकासाचा नावावर मौल्यवान सागवान झाडाची कत्तल व अवैधरीत्या मुरुमाची उत्खनन

34

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.21डिसेंबर):- अतिदुर्गम आदिवासी मानीकगड पहाडावर पाटण वनपरिक्षेत्रा अंतर्गत कोलांडी ते नंदपपा रस्त्याच्ये काम सुरू असून या रस्त्याच्या कामासाठी राजरोसपणे संबंधित ठेकेदार वनातील खुलेआम शेकडो ब्रास मुरुम उत्खनन करुन रस्त्याच्या कामाला वापरत असून या कडे सबंधित वन विभागाचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे चर्चा परिसरात रंगली आहे.

मुरुम उत्खनन करत असताना मौल्यवान सागवान झाडाची जिसीपीच्या सहाय्याने कत्तल केली जात असून मुरुम उत्खनन करताना उपडलेले मौल्यवान सागाची व इतर जातीचे झाडे ताबडतोब तिथून गायब केली जात असल्याचे बोलले जात आहे हा प्रकार राजरोसपणे सुरू असुन सुद्धा खूप मोठा गौडबंगाल संबंधित ठेकेदार आणि संबंधित वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असल्याची चर्चा सुरू आहे या अवैधरीत्या सुरू असलेल्या गौडबंगालवर कारवाई करण्यात येईल का याबद्दल परिसरातील नागरिकांनी लक्ष केंद्रित केले आहे