रामदास आठवले यांच्यातील १९७२ चा दलित पँथर हरवला!

61

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगत होते जो सत्तेत एकवेळ गेला कि तो सर्व विचारधारा विसरून जातो. गुळाच्या ढेपीला जसा मुंगळा चिकटतो तसा नेता समाज चळवळ विचारधारा विसरून सत्तेत राहण्यासाठी किर्याशील राहतो.याचे उतम उदाहरण म्हणजे १९७२ साली तरुणातून पुढे आलेला तरुण तडपदार कुशल संघटक पँथर नेता आता सत्तेच्या मोहजालात कुठे तरी हरवला!.

मुंबईतील वडाळयाच्या सिद्धार्थ होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेऊन नेत्याचे हँडबील, पोस्टर लावणारा रामदास सर्वांचा जवळचा मित्र आणि कार्यकर्ता होता.आणि तो आज ही काही प्रमाणत आहे.तेव्हा ही तो स्वताला नेता म्हणवून घेत नव्हता आज भी घेत नाही.तेव्हा भी कुठे भी बोलताना घाबरत नव्हता आणि आज भी तो बोलताना घाबरत नाही.कोणाच्याही स्टेजवरून तेव्हा भी बिनधास्त बेधडक बोलत होता.आपण कुठे आहोत आणि कोणा समोर बोलतो त्याचे तेव्हा भी भान ठेवत नव्हता आणि आज भी ते राज्यसभेत बोलताना भान ठेवत नाही.त्यामुळे त्याच्या लोकप्रियते वर कोणताही फरक पडला नाही.कारण रामदास तेव्हा दास नव्हता आज मात्र दास असल्या सारखा वागतांना स्पष्टपणे दिसत आहे.म्हणूनच लिहावे लागते १९७२ चा पँथर हरवला!.

रामदास आठवले यांचे तेव्हा फक्त हजारो भक्त होते ते आज लाखोच्या संख्येने राज्यात नव्हे तर देशभरात आणि परदेशात झालेत,नी आहेत.म्हणुन जागतिक बौद्ध परिषदला त्यांनाच बोलविल्या जाते, इतर बुद्धिजीवी विचारवंत नेत्यांना नाही.त्यामुळे ते कुठे भी कधी ही काही बोलले तरी त्यांच्या भक्तावर कोणताच फरक पडत नाही. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून ते सर्व सबुरीने वागतात.त्यांनी खासदारकीसाठी मंत्रीपदा करिता कुठे ही युती आघाडी केली.तरी हा भक्त त्यांच्या सोबत आहेच.शहरातील सुशिक्षित, सुरक्षित नोकरी,धंदा करणारा जसा सोबत आहे त्याही पेक्षा जास्त खेड्या पाड्यातील, शहरातील झोपडपट्टीत राहणारा कार्यकर्ता आणि समाज आठवले सोबत आहे.मग तो सरपंच,नगरसेवक,आमदार बनला नसला तरी तो मेंढरा सारख आठवले मागे जातो. आणि जाणार आहे.

रामदास आठवले केंद्रातील भाजपा सरकार मधील सामाजीक न्याय मंत्री राज्यसभेतील कविता वाचन, विनोद, शेरशाहिरी करण्यासाठीच देशभरात चॅनेल, प्रिंट मिडिया, सोशल मिडिया,फेसबुक या मध्यमा द्वारे मोठया प्रमाणात प्रसिद्ध आहेत.त्यात क्रांतिकारी विचारांचे बाळकडू पिलेला पँथर कुठेच डळकारी फोडतांना किंवा झेप घेतांना दिसत नाही.म्हणूनच लिहतो १९७२ चा पँथर हरवला!.

भारतीय मागासवर्गीय चळवळीत ज्यांनी स्वताची जागा निर्माण केली असे दलित पँथर चे तरुण तडपदार बिनधास्त बेधडक क्रांतिकारी नेते रामदास बंडू आठवले यांचा जन्म २५ डिसेंबर १९५९ ला सांगली जिल्ह्यात झाला.१९७१ ला सिद्धार्थ होस्टेलमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झाले आणि १९७२ ला दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा त्यात सतत सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून रामदास सर्वाना परिचित होता. त्यात त्यांची जडणघडण झाली. हॅंडबिल वाटणारा आणि पोस्टर लावणारा कार्यकर्ता. कालकथीत प्रसिद्ध कवि नामदेव ढसाळ, कालकथीत थोर विचारवंत राजा ढाले, आजचे थोर साहित्यिक ज.वी पवार, कालकथीत प्रा.अरुण कांबळे,या नेत्याच्या पुढे रामदास आठवले कधी निगुन गेले त्यांना हि कळले नाही. पँथर ते राज्याचा केंद्राचा सामाजिक न्याय मंत्री हा प्रवास तसा साधा व सोपा नव्हता. तो केवळ रामाचे दास असता तर त्यांनी एवढी गरुडझेप घेतली नसती.संघर्ष करून त्यांनी अस्तित्व टिकवुन ठेवले आहे.परंतु त्यातील पँथर व भिमसैनिक मात्र संपला आहे. तेव्हाच्या पँथर नेत्याचे आज कुठे अस्तित्व ही दिसत नाही.त्यांचे ना भक्त आहेत ना शिष्य!. समाजात कुठे ही अनुयाय का नाहीत ?. हा व्यक्ती आणि चळवळ यातील फरका आहे. राजकारण,समाजकारण,आर्थिकारण हे नेहमी संधीवर अवलंबून असते आणि चालते. राजकारणात कोणीच कायम मित्र नसतो,तर कोणीच कायम शत्रू पण नसतो.योग्य वेळी संधी आली तर निर्णय घेण्याची क्षमता नेत्यात असली पाहिजे.लोक काय म्हणतील याचा विचार न करता कार्यकर्तानी एकत्रपणे भाजप सेने बरोबर जाण्याचा घेतलेला निर्णय घेतला होता. ते धाडस रामदास आठवले यांनी एकटयानी केले असते तर राज्यातील दुसरया,तिसऱ्या फळीतील नेते,जिल्हा नेते रामदास आठवले सोबत राहिले नसते.रिपाई मध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन आठवले एकाकी पडले असते, त्यांची काकासाहेब,डांगळे सारखे त्यांची गत होयाला पाहिजे होती. ती झाली नाही कारण रामदास कार्यकर्त्यांचा नेता असलेला कार्यकर्ता आहे.म्हणुन तो आज टिकून असला तरी त्यातील १९७२ चा पँथर हरवलेला आहे.

मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार झाल्यावर सर्वात पहिला धावून जाणारा नेता म्हणजे रामदास आठवले.आज ही ते अन्याय अत्याचार झाल्यावर सर्वात प्रथम पोचतात आणि सर्व वृत्तपत्रात फोटोसह बातमी छापून येते. ती धमक इतर कोणत्याही नेत्यात नाही.त्यांची फारशी दाखल प्रशासन व प्रिंट मिडिया घेत नाही.मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी अल्पसंख्याक चळवळीत रामदास आठवले बद्दल नाराजी असली तरी त्यांच्या सारखा समाजात कार्यकर्त्यात मिसळणारा दुसरा नेता नाही.त्यामुळेच समाजात त्याचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत.त्यामुळेच इतर सर्व मागासवर्गीय आंबेडकरी चळवळीतील गटा तटात आठवले दबंग गट म्हणून ओळखल्या जातो. नेते भरपूर आहेत पण तो जिव्हाळा इतर नेत्या मध्ये नाही.वसतिगृहात राहून राजकारणात जागा बनविणारे रामदास आठवले कुशल संघटक आहेत.हे विसरता येणार नाही.कारण ते एकमात्र मान्यताप्राप्त नेते म्हणून देशभर ओळखल्या जातात. त्यांची सर्व मध्यम म्हणजे नाटककार,चित्रकार,विडंबनकार,पत्रकार,संपादक विविध वाहिन्या वरील सिरीयल वाले दाखल घेतात,चला हवा येऊ द्या ने तर त्यांना सर्व समाजाच्या घराघरात पोचविले होते.कारण त्यांची समाजावर काही प्रमाणात पकड आहे.गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसा निमित्य मी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.ते राज्यभरातील सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ताना मना पासून आवडले होते.कोणीच आठवले साहेबाच्या विरोधात असे का लिहले म्हणून मला शिवीगाळ केली नाही,आणि आठवलेच्या एका ही भक्ताने माझे हात पाय तोडण्याची धमकी दिली नाही.कारण ते आठवले नेत्याचे पाळीव कुत्रे नाही. तर एका सच्चा भिमसैनिकाचे सैनिक आहेत. इतर आंबेडकरी विचारांच्या शॉटकट नेते बनणाऱ्या नेत्या विरोधात लिहले तर त्यांचे पाळीव कुत्रे वेगवेगळ्या मोबाईलवर शिवीगाळ,हातपाय तोडण्याच्या धमक्या देऊन आम्ही कोणाचे व कोणत्या विचारधारेचे आहोत हे दाखवून देतात.म्हणून मी छाती ठोक पणे लिहतो कि रामदास आठवले पँथर भिम सैनिक होते. आता मात्र त्यांच्यातील १९७२ चा पँथर हरवला आहे हे मान्य करावे लागेल.

रामदास आठवले एक व्यक्ती राहिले नाही तर एक चळवळ झाली आहे.त्यांना कुठेही कधी भेटता येते.आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुखात,कार्यकर्त्यांच्या नात्यातील दुखात कधीही वेळ काढून भेटणारा व भेटून सामाजिक बांधिलकी जपणारा नेता आहे. त्यांच्या बाबत राजकीय,वैचारिक दृष्ट्या अनेक मतभेद असू शकतात.त्या वेदना त्यांनी अनेकदा एकल्या आणि त्यातून मार्ग काढला, कॉंग्रेस राष्टवादीचे प्रत्येक जिल्ह्यातील नेते रिपाईच्या कार्यकर्त्यांना सालदार,विकाऊ टाकावू समजून वागनुक देत होते.पण भाजप सेना युती बरोबर आठवले गेल्या मुळे खेड्यापाड्यातील वातावरण बदलले आहे.कारण कापटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा अशी म्हण शहाणे लोक सांगतात, तशी परिस्थिती गावागावत होती.खैरलांजी घडल्या नंतर राष्टवादीचा पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभेत धुवा उडला पाहिजे होता.पण तसे झाले नाही याची कारणे कार्यकर्त्यांनी शोधली पाहिजे.रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री म्हणून राजकीय विजय जरी असला तरी त्यांच्यातील १९७२ चा दलित पँथर हरवला आहे. लोक त्यांना लोकनेते संघर्ष नायक म्हणूनच ओळखतात.हे विसरता येणार नाही.म्हणून त्यांच्या वाढदिवसा निमित्य फक्त त्यांच्यातील व्यक्ती,नेता,आणि कार्यकर्ता हे तपासून पाहिल्यावर मला रामदास आठवले सैदव्य कार्यकर्ताना आत्मविश्वासाने कोरे लेटरहेड देणारा नेता,कार्यकर्ता,राजकीय नेते वाटतात .त्यांच्या वाढदिवसा निमित्य त्यांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९