गर्भवती मातांसाठीची जननी सुरक्षा योजनेलाच हरताळ, आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसुती, आरोग्य कर्मचा-यांचा हलगर्जीपणा

32

🔺जिल्हा आरोग्य आधिका-यांना तक्रार चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करा:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि 24डिसेंबर):-ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनवर असुन मोठ्याप्रमाणात आर्थिक खर्च करून गाजावाजा करत दैनिकात आणि टेलिव्हीजनवर जाहीरातीच्या योजना कागदावरच दिसुन येतात प्रत्यक्षात वास्तव भयान असून वैद्यकीय आधिकारी यांची अनुपस्थिति आणि आरोग्य कर्मचा-यांचा मुजोरपणा, रूग्ण जिल्ह्याच्या ठिकाणी रेफर करण्याची व जबाबदारी झटकण्याची मानसिकता दिसुन येत असून असाच प्रकार दि.२१ डिसेंबर मंगळवार रोजी रात्री घडला असुन मौजे. तांदळा ता. गेवराई जि.बीड येथिल सुरेखा कृष्णा माळी या प्रसुतिसाठी मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्या असता तेथील आरोग्य कर्मचा-यांकडुन त्यांना बीडला जाण्याची सुचना केली.

कोणतीही तपासणी न करताच कर्तव्यात कसूर करत बीडला जाण्याचा सल्ला दिला त्यातच त्यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यास नकार दिला, शेवटी महिलेची आरोग्य केंद्राच्या दारातच प्रसुति झाली तरी सुद्धा तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले म्हणून संबधित प्रकरणात जबाबदार कर्मचा-यांना निलंबित करण्यात येऊन तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड, जिल्हा आरोग्य आधिकारी बीड, तालुका आरोग्य आधिकारी गेवराई यांना केली.