महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी जयंती साजरी

28

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.२४ डिसेंबर):-२०२१ शुक्रवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे साने गुरुजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेचे सामूहिक गायन करून झाली. प्रास्ताविक एम.बी.मोरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. एम.के.कापडणे होते. अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी.आर.सोनवणे होते. मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शाळेतील उपशिक्षक पी.डी.पाटील यांनी साने गुरुजी यांचा थोडक्यात जीवन परिचय सांगून छोटीशी दोन मित्रांची बोधकथा सांगितली. यानंतर उपशिक्षक एस.व्ही.आढावे यांनी जीवन संघर्ष सांगून वेगवेगळे उदाहरण दाखले देऊन माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे व मानवता धर्म जोपासावा. श्यामची आई पुस्तकाचे लेखन, प्रताप हायस्कूलच्या आठवणी सांगितल्या. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.एम.के.कापडणे यांनी गुरुजींचे लहानपणीचे उदाहरण सांगितले. जसे ओल्या पायाला घाण लागते तर पाय खराब होतात तसं मनाला घाण कचरा नका लागू देऊ व मन स्वच्छ व निर्मळ ठेवा, व सर्वांना सोबत घेऊन प्रवाहात आणण्याचं काम केले.असा मोलाचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.