शेंबाळपिंप्री येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

28

🔹वंचित बहुजन आघाडीच्या आरोग्य शिबिराची उपविभागीय अधिकारी सावनकुमार साहेब यांनी केली प्रशंसा

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.24डिसेंबर):-वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका यांच्या मार्फत तालुक्यातील विविध गावामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.असेच आयोजन शेबांळपिंप्री येथे करण्यात आले होते.या आरोग्य शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी श्री.सावनकुमार साहेब उपस्थित होते.त्यांनी या उपक्रमाची प्रसंशा केली.व प्रत्येक राजकीय पक्षाने अश्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले पाहिजे.जेणेकरुन ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात.

आरोग्य तपासणी शिबिराला उपस्थित डॉ. राहुल जाधव अस्थी रोग तज्ञ व सुधीर मारकड जनरल फिजिशियन व मेडिकेअर स्टाफ उपस्थित होता .

यावेळी डी.के.दामोधर जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा, बुद्धरत्न भालेराव अध्यक्ष पुसद तालुका, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भावसार साहेब,सरपंच रवींद्र महाले,बापुराव कांबळे पोलिस पाटील,जेनुल सिद्दीकी माजी जिल्हा परिषद सदस्य ,मुनिर सिद्दीकी,दिपक पदमे,सचिन सूर्यवंशी,प्रदीप वाहुळे,माधव मनोहर,गौतम वाहुळे,विनोद बरडे, प्रसाद खंदारे,संघपाल कांबळे,दादासाहेब जोगदंडे, राहुल जोगदंडे,सावन मनवर,अविनाश जोगदंडे, भगवान कांबळे, सुभाष श्रावणे,श्रीकांत धबाले,माधव कांबळे,गुलाब वाहुळे,गौतम चौरे,कासम खान पठाण,शशांक खंदारे,प्रकाश खिलारे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.