चिमुरात पुरोगामी शिक्षक संघटनेचे अधिवेशन संपन्न

35

🔸संघटनेची तालुका शाखा गठीत

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.25डिसेंबर):-गुरुदेव सांस्कृतिक सभागृह वडाळा (पैकु) चिमूर येथे नुकतेच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना तालुका शाखा चिमुरचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे, उदघाटक राज्य सरचिटणीस हरिष ससनकर, विशेष अतिथी म्हणून महिला मंचच्या जिल्हाध्यक्षा सुनिता इटनकर, सरचिटणीस शालिनी देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन चिंचोलकर, ताराचंद दडमल, रवी वरखेडे, सिंदेवाही तालुकाध्यक्ष रवींद्र डेंगे, भद्रावती तालुकाध्यक्ष जगदीश ठाकरे, सरचिटणीस गंगाधर बोढे, अतुल वराडे, तुकाराम उरकुडे, विनोद हटवार, विनायक औतकर, सुनील मसराम, नरेंद्र मुंगले, ब्रम्हानंद माळवे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी प्रवेशित व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेची तालुका शाखा गठीत करण्यात आली. त्यात तालुका नेता नरेंद्र मुंगले, चिमूर तालुकाध्यक्ष गोविंद गोहणे, उपाध्यक्ष प्रदीप गौरकर, सलीम तुर्के, लक्ष्मन कारमोरे, जयवंत गावंडे, सरचिटणीस जनार्धन केदार, कार्याध्यक्ष सरोज चौधरी, कोषाध्यक्ष गोवर्धन ढोक, कार्यालयीन सचिव राजू चांदेकर, संघटक प्रभाकर पराते, महिला मंचच्या तालुकाध्यक्षा कल्पना महाकाळकर, उपाध्यक्ष रुपमाला गजभे, अरुणा चिचपाले, सरचिटणीस मनीषा हजारे, कार्याध्यक्ष गीता ठाकरे, कोषाध्यक्ष वंदना हटवार आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र मुंगले, सूत्रसंचालन गीता ठाकरे, कल्पना महाकाळकर यांनी केले. उपस्थितांचे आभार सरोज चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बाळू नंदनवार, सचिन शेरकी, संदीप मेंडूले, चुडामण मुळे, पांडुरंग मेहरकुरे, प्रकाश आत्राम, नंदू सोयाम, अरुण चौधरी, शेडामे, दिघोरे, पसारे, टाकसाळे आदीने मोलाचे सहकार्य केले