नायगाव तालुक्यातील एका मेंढपाळावर जीवघेणा हल्ला

32

✒️नायगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नायगाव(दि.25डिसेंबर):-कुंटूर येथील रहिवाशी असलेले मेंढपाळ रामा गंगाराम यांचे सालगडी (नौकर) अशोक गंगाधर धुमाळे हा लातूर फाटा ते विष्णुपरी रोडवर भगवान बाबा चौक परिसरात मेंढ्या चारत असताना कृष्णा ढेंबरे याने मेंढपाळांला दगडाने मारहाण करून जबर जखमी केल्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील रहिवाशी असलेले मेंढपाळ रामा गंगाराम यांचे सालगडी अशोक गंगाधर धुमाळे हा लातूर फाटा ते विष्णुपरी रोडवर भगवान बाबा चौक परिसरात दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मेंढ्या चारत असताना नांदेड येथील रहिवासी असलेला कृष्णा ढेंबरे ह्याने धुमाळ यास येथे का मेंढ्या चारतोस म्हणून दगडाने मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने रामा शिगळे याच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या तरुणांवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मात्र अजूनही मारहाण करणाऱ्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली नाही.सदरील हल्ल्यात जबर जखमी झालेल्या मेंढपाळाला न्याय देण्यात यावा अन्यथा धनगर समाजाचे नेते चांदू आंबटवाड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

याप्रकरणी न्यायासाठी न्याय मिळवून देण्यासाठी चांदू आंबटवाड , मल्लू देवदे ,हनमंत देवदे, मोहन गुंठे , शिवाजी शेटे, गोविंद शिगळे , अशोक महादाळे ,आनंदा शिगळे ,संभाजी गुंठे, रामदास बहिरे , लक्ष्मण शिगळे , शिवाजी करदोडे , बालाजी संभाडे, पोचू शेट्टे, बालाजी महादाळे ,गणेश बिस्मिले,पोचलाजी संभाडे , चंद्रकांत महादाळे , शिवाजी डोके ,गोविंद बिस्मिले , गोविंद कोमराजी बिस्मिले, कोंडीबा शिगळे ,देविदास देवदे ,मुंजाजी बिस्मिले, संदीप गुंठे ,अमराजी गारोळे आदी प्रमुख समाजबांधव हल्ल्यात जखमी झालेल्या अशोक यास न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेतली आहे.