किशोरवयीन मुलींनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक…डॉ गीता वीरकर

99

✒️अमोल उत्तमराव जोगदंडे(तालुका प्रतिनिधी)मो:-8806583158

उमरखेड(दि.२५डिसेंबर):-पार्वती हेल्थ फाउंडेशन च्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त लेक महाराष्ट्राची या महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत आरोग्य जागरूकता व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आदिवासी आश्रम शाळा ढाणकी येथे करण्यात आले . आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी प्रा आ केंद्र ब्राह्मणगाव च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.गीता वीरकर मॅडम यांच्या हस्ते करून औषधोपचार करण्यात आला. किशोरवयीन मुलींनी आपल्या आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत डॉ विरकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले, सर्व विद्यार्थ्यांची तपासणी पार्वती चँरीटेबल हाँस्पीटल उमरखेड चे संचालक डॉ.विष्णुकांत शिवणकर यांनी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष टी.एम. मुखेडे माध्यमिक मुख्याध्यापक हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून एस.एस.मुटकुळे प्राथमिक मुख्याध्यापक ,पार्वती ग्रुप उमरखेड चे संस्थापक व्ही के शिरडकर, आश्वीनी चंदनकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले .वर्ग नववी मधील विद्यार्थिनी प्रणाली पाठमोरे ,रक्षा राजने ,सुवर्णा वाकोडे यांनी स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले .यावेळी डॉ.शिवणकर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी व स्वच्छते बद्दल मार्गदर्शन केले .

निपून भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेतील प्रथम क्रमांक कु.राणी कोलूरवाड,द्वितीय क्रमांक कु.वैष्णवी बारापात्रे ,तृतीय क्रमांक कु.सुवर्णा वाकोडे तसेच उत्तेजनार्थ बक्षीस शुभम भिसे ,कु.वनमाला जंगले ,कु. शिवअमृता कदम या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले .कार्यक्रमाचे संचालन श्री.पी. एस.तामगाडगे यांनी केले तसेच प्रास्ताविक श्री.सी.बी. दांडेगावकर व आभार प्रा.श्री.प्रशांत व-हाडे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गाजेवार सर, सुरोशे सर, कत्ते मॅडम,दिलीप पवार व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.