विद्यानिकेतन मध्ये नाताळाच्या निमित्ताने लघू नाटिकांचे आयोजन…..

58

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.26डिसेंबर):-विद्यानिकेतन दादावाडी परिसरात सि.बी.एस.सी.विभागाच्या वतीने नाताळाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या लघू नाटकांचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्य सादरीकरणात इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यावेळी श्रीमती मंजुषा रामटेके यांनी परिश्रम घेतले.

यावेळी कोरोना नियमांचे पालन करुन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . विद्यानिकेतन स्कुल च्या प्राचार्य सपना पिट्टलवार यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. विद्यानिकेतन स्कुल चे अध्यक्ष राज रणजितजी पुगलिया यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे विशेषत्वाने कौतुक केले.