वंचित बहुजन आघाडीची विविध तालुका कार्यकारणी गठीत करण्यासाठी होणार बैठक

26

✒️अतुल उनवणे(विशेष प्रतिनिधी)

जालना(दि.28डिसेंबर):- वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन आणि जालना तालुका कार्यकारणी गठीत करण्यात येणार आहे त्यासाठी बदनापूर तालुका कार्यकारणी गठीत करण्यासाठी दिनांक 2/1/2022 रोजी दुपारी 1 वा तर भोकरदन तालुका कार्यकारणी गठीत करण्यासाठी दिनांक 3/1/2022 रोजी दुपारी 1 वा आणि जालना तालुका गठीत करण्यासाठी 4/1/2022 रोजी दुपारी 1 वा वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा संपर्क कार्यालय सरस्वती भुवन शाळेच्या जवळ जुना जालना येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्यातील तालुका कार्यकारणी नव्याने गठीत करून तरूणांना जास्तीत जास्त सोबत घेऊन येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीची तयारी करण्यात येणार असून त्यासाठी पक्ष शाखा व सभासद नोंदणी आणि बुथ बांधणी करण्यात येणार आहे.तरी बदनापूर, भोकरदन, जालना तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वा वर विश्वास ठेवणारे चळवळीतील पँथर व वंचित बहुजन आघाडीत काम करण्यास इच्छुक असणार्‍या तरुणांनानी आपपाल्या तालुकानिहाय बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे साहेब यांनी केले आहे.