विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे ख्रिसमस साजरा

41

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.29डिसेंबर):-नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला विनायक विज्ञान महाविद्यालय येथील इंग्रजी व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ख्रिसमस कॅरोल्स या शीर्षकाखाली नाताळ गीतांचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमादरम्यान इंग्रजी व मराठी मधील नाताळ गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कराओके संगीताच्या तालावर सांताक्लॉजचा कॅप्स परिधान करून, जॉय टू द वर्ल्ड, जिंगल बेल्स, सायलेंट नाईट, वी विश मेरी क्रिसमस, यासोबतच गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला यासारख्या बहारदार गीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या संस्थेचे उपाध्यक्ष बॉटनी विभागाच्या विभागप्रमुख तसेच आय क्यू ए सी समन्वयक डॉक्टर सुचिता खोडके लाभल्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करण्याकरिता, तसेच विविध संस्कृती आणि धर्माची ओळख करून देण्याकरिता अशा कार्यक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे अशा शब्दात कार्यक्रमाचे स्तुती केली. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून झूलॉजी डिपार्टमेंटचे डॉक्टर गजेंद्र सिंग पोचलोरे सर व डॉक्टर स्वप्नील तिनखेडे सर, शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर श्याम दळवी सर त्याच बरोबर महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर नितेश चोरे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी विभागाचे प्राध्यापक राजीव तायडे यांनी केले व आभार प्रदर्शन मराठी विभागाचे प्राध्यापक रुपेश फुके यांनी केले.