ईल्लूर येथे कॅरम स्पर्धेचे उद्घघाटन

48

🔸खेळाच्या माध्यमातून व्यक्तीतमत्व घडवा – जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार

🔹अनेकांकडून प्रोत्साहनपर बक्षीस

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.30डिसेंबर):-आजचे युग स्पर्धेचे आहे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी किडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत या स्पर्धांमध्ये मोठया प्रमाणावर खेळाडू सहभागी होत असून खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास घडवावा असे प्रतीपादन जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदिलवार यांनी केले.चामोर्शी तालुक्यातील ईल्लूर येथे कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन चॅम्पियन गृप ईल्लूर द्वारा आयोजीत करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घघाटन जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार यांनी केले अध्यक्षस्थानी सरपंच तुळशीराम मडावी तर विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ता संजयराव पंदिलवार उपसरपंच रामचंद्र बामणकार. पोलिस पाटील तुळशीराम चनकापुरे.भिकाजी बोरकूटे. सत्यवान कुलसंगे. भिकाजी मंडरे. दिलीप सातर हे उपस्थित होते यशस्वीतेसाठी कार्यकारी मंडळ रवी बामणकार.त्रिलोचण अवथरे. अतुल बोरकुटे. दिलीप कोहपरे. सुदर्शन खोबरे. प्रदिप चौधरी. रामदास राऊत. दत्तू येलेकार.दिलीप सातर व ईल्लूर ग्रामवासियांनी सहकार्य केले