नवीन वर्षात नवीन काय आहे?

28

जगात खूप लोकांना नवीन वस्तूचे किंवा वास्तूचे आकर्षण असते. ते जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत शांतपणे झोप येत नाही.कष्टकरी कामगार मजुरांना नवीन कपडे हे सणासुदीला घेतले तर आनंद होतो, इतर वेळी त्यांचे त्यांना महत्व नसते,परंतु श्रीमंतांना सणासुदीचे बिलकुल महत्व नसते,ते कधी नवीन कपडे घेऊन घालू शकतात,कधीही मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन पाहिजे ते खाऊ आणि पियू शकतात.त्यांना नवीन जुने असे काहीच नसते.दरवर्षी नवीन वर्ष येते म्हणजे नेमके काय येते ते मला कधीच समजले नाही, पण हजारो लाखो लोक त्या नवीन वर्षाच्या दिवसांची सुरुवात दारू पिण्याने करतात आणि शेवटही दारू पिऊन करता.त्यातच त्यांना मोठा आंनद वाटतो, पण वर्षभरात आपल्या हातुन कोणते चांगले काम झाले आणि वाईट कोणते घडले यांचा विचार करीत नाही. आपण कुटुंबातील सदस्य सोबत मित्रांसोबत कसे सुखात जगलो किंवा दुःखात जगलो यांचा कोणत्याही परिस्थितीत आपण कसे जीवन जगलो यांची नोंद ठेवली नसेल तर कमीतकमी आठवणी जाग्या ठेवल्या पाहिजेत,जेणेकरून पुढील वर्षी त्यापेक्षा जास्त चांगलं वाईट घटना आपल्या जीवनात येतील आणि जातील यांचा आपण कसा मुकाबला करू याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.नवीन वर्षात नवीन काय आहे?.सर्व बाजूने गांभियाने चर्चा,सुसंवाद झाला पाहिजे.

आज ३१ डिसेंबर २०२१ म्हणजेच वर्ष २०२१ चा शेवचा दिवस, गेली दोन वर्ष आपण सर्वांनी कोरोना महामारीच्या संकटामुळे झालेल्या लॉक डाऊन ला सामोरे जाऊन खूप जीवघेणा संघर्ष केला.त्यावेळी ज्यांनी सामाजिक,आर्थिक आरोग्यासाठी योग्य ती मदत सहकार्य केले त्यांचे मनापासून आभार,२०१९/२०/२१ वर्षाने बरंच काही हिरावून घेतले.त्यात निसर्गाचा कमी आणि राज्यकर्त्याचा दोष जास्त होता.डॉक्टर कधी देवदूत झाले तर कधी यमदूत,सरकारी नोकरी करणाऱ्यांनी तीच भूमिका बजावली काही लक्षवेधी कामामुळे तर काही वाईट वागण्यामुळे कायम लक्षात राहतील. अनेक मित्रानी मैत्रीणीनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दिलेल्या मदतीची प्रत्येकाने कृतज्ञ ठेवावी.नवीन वर्षात नवीन काय आहे?.यांचा विचार करावा.
घर असो कि घराचा परिसर कामाचे ठिकाण कार्यालय असोकी कंपनी चा आतबाहेरचा परिसर सर्वच ठिकाणी माणूस नांवाचा प्राणी होता.आणि माणूस म्हटले की चुका होणारच, मने दुखवली जाणारच, कळत नकळत कोणा कडून कोणाचे असे काही वाईट घडलं असेल तर आपण त्यांना उदार मनाने माफ करावे व मैत्रीचे अनमोल नाते मनापासुन जपावे.सामाजिक बांधिलकी जपावी आणि झालेगेले विसरून मावळत्या वर्षाला गुडबाय करावा.

२०२१ च्या शेवटच्या मंगलदिनास खुप खुप मंगला कामना देऊन पुन्हा पुन्हा भेटू नको म्हणावे..आणि नवीन वर्षात नवीन काय आहे?.ते पाहावे.तुम्हा सर्वांना कळवायचे आहे की आपले सर्वांचे प्रिय आणि सुप्रसिद्ध मित्र श्री २०२१ हे या महिन्याच्या ३१ तारखेला कायमचे निवृत्त होत आहेत.त्याच्या १२ बायका, ५२ मुले आणि ३६५ नातवंडे शुक्रवार, ३१ डिसेंबर रोजी २३.५९ वाजता ग्रँड सेंड-ऑफला उपस्थित राहतील. तथापि,त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मला तुम्हाला कळवण्यास सांगितले की ते तुमच्या सर्व समस्या,संकटे,आजारपण,निराशा,अपमान,अपयश,नकार,सर्व प्रकारचे आघात /अपघात,नैराश्य,चिंता,संताप,मत्सर, दु:ख,अहंकार,भिती,राग,अप्रामाणिकपणा,निराशावाद, बेफिकीरी,निंदकपणा,बेजबाबदारपणा,अविश्वासपणा,चिडखोरपणा,ओंगळपणा स्वतः कडे घेऊन गेल्या दोन तीन वर्षात जे जे दिले ते सर्व सोबत घेऊन जात आहेत.

आणि नवीन वर्षात नवीन काय देणार आहे.निवडणुकीतील जाहीरनामा आश्वासन नव्हे तर माणसातील मानसिकता वापरून अंमलबजावणी सर्वं मिळून करावी.त्यांचे उत्तराधिकारी श्री २०२२ यांनी मला सर्व वाचकांना हे कळवायला सांगितले की, ते येताना आपणांसाठी खालील गोष्टी घेऊन येणार आहेत.दीर्घ आयुष्य,चांगले आरोग्य, संपत्ती,प्रेम,भरपूर आशीर्वाद,शांती,आनंद,नीतिमत्ता,पदोन्नती,समृद्धी आणि उत्साह, विपुलता,यश, इच्छा,आकांक्षा, बुध्दी व धन,समता,स्वातंत्र्य आणि बंधुभाव घरा घरात परिसरात गांवात तालुख्यात जिल्ह्यात राज्यात आणि देशात सर्वधर्मसमभाव नांदावा ही सर्वच माणसांकडून अपेक्षा ठेवून आपण सर्वजण त्यांचे सहर्ष स्वागत करुया.नवीन वर्ष आपणांस वाचकांना,संपादक,संपादकीय मंडळांसाठी व सर्वांच्या कुटुंबियांना, आप्तेष्टांना, मित्र परिवाराला आनंदाचे, सुख समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो हीच निर्सगाच्या चरणी त्रिवार वंदना.सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९