डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.1जानेवारी):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे नववर्षप्रारंभ आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि संगीत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ब्रह्मपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पवन पर्व या साप्ताहिकाचे संपादक जीवनजी बागडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे, मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगदीश मेश्राम यांची विशेष उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.तुफान अवताडे, संगीत विभाग प्रमुख प्रा. गणेश तिवाडे विचार मंचावर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. जीवंन बागडे यांनी भीमा कोरेगाव चा इतिहास प्रस्तुत करून 1 जानेवारी 1818 रोजी झालेले युद्ध हे वर्षानुवर्षे माणूसपण नाकारलेल्या समाजाने आपली अस्मिता आणि आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी लढलेले युद्ध होते असे प्रतिपादन केले.

प्रा. डॉ.स्निग्धा कांबळे यांनी तसेच प्रा डॉ. जगदीश मेश्राम यांनी उपस्थितांना नववर्ष आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात प्रेमकुमार लोणारे, प्रणय गजभिये, तृप्ती अंबादे, प्रज्वल मेश्राम,रूपेश शेन्डे, धनश्री जनबंधू, विनोद खूखदेवे, तृप्ती जांभूळकर, प्राची बोरकर, सुरेखा देऊरकर, बेबी वागधरे, एन. सी. सी. ग्रुप, बी. कॉम द्वितीय वर्ष ग्रुप या विद्यार्थ्यांनी तसेच प्रा. गणेश तिवाडे यांनी बुद्ध-भीम गीते सादर केली.

या बहारदार संगीतमय कार्यक्रमाला प्रा. गणेश तीवाडे यांनी हार्मोनियमवर तर किमिंदा सेलोकर यांनी तबल्यावर स्वरसाथ दिली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी गोपाल दिघोरे याने केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.तुफान अवताडे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार मीना बनकर या बी. ए.द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने मानले.महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि बहुसंख्य विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.