कमळवेल्ली येथे नव्याने रुजू झालेल्या ग्रामसचिवांचा सत्कार

33

🔹युवा कार्यकर्ते अमोलभाऊ ठाकरे यांची कल्पना

✒️सुनील शिरपुरे(झरीजामणी प्रतिनिधी)

झरीजमनी(दि.2जानेवारी):-तालुक्यातील ग्राम पंचायत कमळवेल्ली येथे आज नवीन वर्षाचे औचित्य साधून नव्याने रुजू झालेले ग्रामसचिव श्री.पी एन.बद्दमवार साहेब यांचा ग्राम पंचायत कार्यालयात प्रथम दिवसी छोटेखानी सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच श्रीमती पुष्पाबाई चुक्कलवार, उपसरपंच श्री.वामन हलवेले, ज्येष्ठ नागरिक श्री.मोहनराव चुक्कलवार, युवा कार्यकर्ते श्री.अमोलभाऊ ठाकरे व ग्राम पंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते. सर्वप्रथम उपसरपंच श्री.वामन हलवेले यांचे हस्ते श्री.बद्दमवार साहेब यांना शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्वांनी सचिव साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

श्री बद्दमवार साहेबांनी ग्राम पंचायतचा कार्यभार चांगल्या रितीने पार पाडण्याकरीता सतत प्रयत्नशील राहण्याचे व कामकाजाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी चहापाणी नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. युवा कार्यकर्ता श्री.अमोलभाऊ ठाकरे यांच्या कल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्राम पंचायत कर्मचारी श्री.मोहन शिरपुरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. शेख जमाल यांनी केले.