लाखो रुपयांची देखणी जनावरे दावणीला-शेतकरी पोटाला चिमटा घेऊन जपताहेत पशुधन

36

✒️प्रतिनिधी खटाव(नितीन राजे)

खटाव(दि.2जानेवारी):-लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमपूज्य श्री सेवागिरी महाराज पुसेगाव ,तालुका खटाव, जिल्हा सातारा ,यांच्या 74 व्या पुण्यस्मरण निमित्त सलग दुसऱ्या वर्षीही कोरोना च्या पार्श्वभूमीवर नियम ठेऊन रथ दर्शनास परवानगी दिली पण यात्रेचा खरा आत्मा व शेतकऱ्यांची व प्रमुख्याने खिलार बैलांच्या जातीची यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली ही महाराष्ट्रातील एक मुख्य यात्रा असून सलग दुसऱ्या वर्षी जातिवंत व देखणी जनावरे तसेच दावणीला बांधून राहिली आणि शेतकरी आर्थिक संकटात आला आहे.

मध्यंतरी दहा वर्षाच्या कालावधीत बैल गाड्यांच्या शर्यतीवर बंदी आल्याने खिलार गाई व बैल संगोपन शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत गेले. तरीदेखील पुसेगाव येथील यात्रेमध्ये जनावरांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात होत असे. त्यासाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट मोठ्या प्रमाणात जनावरांना सर्व सुविधा पूर्ण कडे लक्ष देते शेतकऱ्यांसाठी वीज पाणी यांचा पुरवठा केला जातो.

परंतु कोरोना काळात यात्रेवर बंदी आल्याने शेतकऱ्यांची देखणी जातिवंत व सुंदर जनावरे तसेच दावणीला बांधून राहिले त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर झाला.आता नुकतीच बैलगाडी शर्यतीवर बंदी उठल्याने येथे यात्रांमध्ये आपल्या जनावरांना चांगली किंमत येईल अशी अपेक्षा असताना ओ मायक्रोनच्या विषाणू ने डोके वर काढल्याने पुन्हा सण,उत्सव,गर्दी, यावर बंदी आल्याने शेतकरी वर्गात यात्रेकरू यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.