धारुर तालुक्यात रास्ता रोको; बीड परळी महामार्ग ठप्प

26

🔹ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे

🔸चाटगाव चा रस्ता नाही झाला तर ग्रामस्थांसह गोविंद केकान यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत उपोषणास बसणार

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.3जानेवारी):-स्वतःच्या गावाचा रस्ता डांबरीकरण व्हावा याकरिता धारुर तालुक्यातील चाटगाव ग्रामस्थांनी रविवारी रास्ता रोको केला. सामाजिक कार्यकर्ते गोविंद केकान यांनी या रास्ता रोको चे नेतृत्व केले. बीड परळी महामार्ग ते चाटगाव हे चार किमीचे अंतर आहे.मात्र या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांची तारांबळ उडत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून या रस्त्याला डांबरीकरण व्हावे याकरिता येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद केकान यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला.सन 2018-19 या वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चार किमी रस्त्याला मंजुरी मिळाली. मात्र अद्याप रस्त्याचे काम करण्यात आले नसल्यामुळे चाटगाव ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

रविवारी सकाळी बीड परळी महामार्गावरील चाटगांव पाटीवर गोविंद केकान यांच्यासह चाटगांव ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. यावेळेस जवळपास एक किमी पर्यंत रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळित झाली होती.दिंद्रुड पोलिसांना निवेदन देत रास्ता रोको चा समारोप करण्यात आला असून लवकरात लवकर चाटगाव चा रस्ता नाही झाला तर ग्रामस्थांसह गोविंद केकान यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत उपोषणास बसणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.