केज तालुक्यातील साळेगाव परिसरात बिबट्या नव्हे तर तडस, वनविभागाने केली पाहणी

34

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

केज(दि.3जानेवारी):- तालुक्यातील साळेगाव परिसरामध्ये बिबट्या असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्या घटनेची माहिती धारूर वनविभागाला दिल्यानंतर आज सकाळी वनविभागाने साळेगाव परिसरात जावून पाहणी केली असता बिबट्या नसून तडस असल्याचा निष्कर्ष वनविभागाने मांडला आहे.

काल १ जानेवारी रोजी सायं.७ वाजण्याच्या दरम्यान नांदूर येथील ढाकणे हे मांगवडगावकडे जात असताना त्यांना साळेगाव शिवारात बिबट्यासारखा प्राणी आढळून आला. हा प्राणी त्यांना पाहून युवराज बजगुडे यांच्या शेतामध्ये घुसला. सदरील माहिती ढाकणे यांनी गावातील सरपंच कैलास जाधव व उपसरपंच अमोल मुळे यांना दिली.

त्यानंतर गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला. २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता धारूर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी चिकटे, वनपरिमंडळ वरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक साळेगाव येथे दाखल झाले.

या पथकात वनरक्षक श्रीमती सारिका मोराळे, संभाजी पारवे, वचिष्ट भालेराव, चालक शाम गायसमुद्रे यांचा सहभाग होता. त्यांच्या टिमने सदरील ठिकाणच्या ठस्याची पाहणी केली असता ते ठस्से बिबट्याचे नसून तडसाचे असल्याचे त्यांनी सांगितले.