परळीत संशोधक विद्यार्थ्यांचे मागील दहा दिवसांपासून आंदोलन सुरुच

29

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.3जानेवारी):-बार्टीतर्फे देण्यात येत येणारी अधिछात्रवृत्ति – 2018 एमफील ते पीएच.डी पाच वर्षांसाठी नियमित करण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण राज्यातील संशोधक विद्यार्थी परळीत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत.

या विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात ,अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती.विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या आंदोलनाला भेट देखील दिली.मात्र, या भेटीदरम्यान प्रश्न सोडवला न गेल्यानं विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठीचे आंदोलन सुरूच ठेवले आहे.दरम्यान, सामाजिक न्याय मंत्र्यांकडून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्यानं विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.