अनुज सारडा चे आयआयटी परीक्षेत यश

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

परभणी(दि.3जानेवारी):-शहरातील बाळासाहेब ठाकरे नगर येथील रहिवासी हनुमान सारडा व किरण सारडा यांचा मुलगा अनुज याने सन 2021 यावर्षी झालेल्या जे ई ई ॲडव्हान्स या परीक्षेत यश प्राप्त करून ऑल इंडिया रँक ईडब्ल्यूएस 220 मिळविला आहे. तसेच तो आय आय टी कानपूर येथे कंप्यूटर व मॅथ या शाखेस प्रवेशास पात्र ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल दिनांक 2 जानेवारी रोजी मराठवाडा हायस्कूल व सारडा परिवार यांच्यातर्फे त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला व त्याच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेश्वरी सभेचे सदस्य केदारनाथ सारडा तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय जाधव, नूतन विद्या समितीचे कोषाध्यक्ष श्रीनिवास मुंदडा, जिल्हा परिषद सदस्य राजेश फड, स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय, सायाळा च्या प्राचार्य तनुजा कापरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ रोडे यांनी केले तर माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.