भारतीय स्त्री मुक्तीच्या जनक सावित्रीमाई फुले – महेंद्र ब्राम्हणवाडे

33

🔸जिल्हा काँग्रेस कमिटी व ओबीसी विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.3जानेवारी);- भारतीय स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत आहे. मात्र, त्यांच्या शैक्षणिक विकासाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आहेत. आजच्या स्त्रीने सावित्रीबाईंचा आदर्श घेतला तर देशाचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागणार नाही. असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले.जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली व ओबीसी विभागाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, शहर अध्यक्ष सतिश विधाते, सोशअल मिडिया सेल प्रदेश महासचिव नंदू वाईलकर, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान काँग्रेसचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष अपर्णा खेवले, जिल्हा सचिव तथा निवडणूक सल्लागार सुनील चडगुलवार, नगरसेवक रमेश चौधरी, महासचिव समशेरखान पठाण, महासचिव घनश्याम वाढई, शहरकार्याध्यक्ष आशीष कामडी, ज्येष्ठ नेते महादेव भोयर, जितेंद्र मूनघाटे, हरबाजी मोरे, प्रभाकर कुबडे, दामोदर मंडलवार, कृष्णा झंजाळ, सदाशिव कोडापे, जीवनदास मेश्राम, अँड.अशोक चलाख, विश्वनाथ राजनहीरे, संदीप राजनहीरे, वसंत राऊत, दिवाकर निसार, डी. आर. मेश्राम, भरत येरने, वंदना धोके, सुनीता रायपुरे, वर्षा गुलदेवकर, सलामे ताई सह अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.