पद्युत्तर विभागातर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

32

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.4जानेवारी):-येथील नेवजाबाई हितकरिणी महाविद्यालयातील पद्युत्तर विभागाच्या वतीने स्त्रीशिक्षणाची पाया घालणाऱ्या,विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा. नवघडे मॅडम,मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.प्रकाश वट्टी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.निकोडे मॅडम,प्रा.चौधरी मॅडम, प्रा.कोठेवार, प्रा सुंदरकर,प्रा.शेंदरे मॅडम तसेच सदर कार्यक्रमाला प्रा.लालाजी मैंद,प्रा माधव चुटे, प्रा.अतुल अंबादे, प्रा.प्रशांत राऊत,प्रा.रुमाकांत तुंबडे,प्रा.संदीप ठेंगरे,प्रद्युत्तर विभागाचे विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.वट्टी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्या शिक्षणरूपी वेलाला गगणावरी नेण्याचे काम आजच्या मुलींनी केलं पाहिजे.आजही समाजामध्ये ज्या स्त्रियांबद्दल अंधश्रद्धा,रूढी,परंपरा पसरलेल्या आहेत त्या मोडून काढण्याचे सामर्थ्य आजच्या स्त्रीमध्ये निर्माण करण्याची गरज आहे तेव्हाच आजच्या स्त्रीला खऱ्या अर्थाने स्वतंत्र मिळेल असे मौलिक मार्गदर्शन केले.तसेच प्रा.नवघडे मॅडम यांनी जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी 1848 ला स्त्रीशिक्षणाचा पाया रचला तेव्हापासून तर आज पर्यंतच्या स्त्रीशिक्षणाचे कथन केले.मंचावर उपस्थित सर्व प्राध्यापकांनी व काही विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रतीक्षा वणशिंगे तर आभार काजल राऊत हिने मानले.