विश्वदिप महाबोधी बुध्दविहार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

29

✒️श्रीरामपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

श्रीरामपूर(दि.4जानेवारी):-विश्वदिप महाबोधी बुध्दविहार श्रीरामपुर व सुजाता महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुजाता महिला मंडळाच्या अध्यक्षा रत्नमालाताई शेंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून जयाताई काळे, मंगलाताई गुढे, वत्सलाबाई मनवर उपस्थित होत्या.

सुरवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सुजाता महिला मंडळाच्या भगिनींनी बुद्धवंदना घेतली.

या प्रसंगी भिमाकोरेगाव शौर्यदिनाचे निमित्ताने शुरविरांना आदरांजली वाहिली.शालिनीताई आळणे यांनी आपल्या प्रास्ताविकात भिमाकोरेगाव शौर्यदिनाची माहिती दिली.प्रमुख अतिथी जयाताई काळे, मंगलाताई गुढे, वत्सलाबाई मनवर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर माहिती दिली.

मनकरणाबाई कांबळे,चंचल मनवर, पल्लवी मनवर यांनी गित सादर केले.कार्यक्रमाचे संचलन शालिनीताई आळणे यांनी तर आभारप्रदर्शन एकताताई खोडके यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजाता महिला मंडळाच्या अनिता ताई इंगोले, सुजाताताई दवने,सविता ताई काजळे,रंजना ताई आळणे, मनकरणाबाई कांबळे,तसेच बुद्ध विहार समितीचे साहेबराव गुजर, सुधाकर बनसोड,क्रुषणा दिघाडे, भिमराव खोडके, विजयराव स्थुल, तुकाराम चौरे, प्रकाश आळणे, प्रल्हाद खडसे,लोडबा सांगाडे आदींनी सहकार्य केले.सरणतय गाथेनी कार्यक्रमाची सांगता झाली.