मुलगंध कुटी बुद्ध विहार नागसेन नगर हदगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

27

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव-नांदेड,प्रतिनिधी)

नांदेड(दि.4जानेवारी):-मुलगंध कुटी बुद्ध विहार नागसेन नगर हदगांव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यात आदर्श वाठोरे,आरोही काळबांडे,जान्हवी,अक्षद यश साव्य, सोनाक्षी, ऐश्वर्या,शैलजा समिक्षा,यश ,आर्या पद्मावती,समिक्षा, संघर्ष, सांची,पुजा,राणी, रिया,सोनी आयुष,आदिती,काव्या मानवी वैभवी,अमित, आराध्या या सर्व विद्यार्थ्यांमध्ये साव्य संदेश डोंगरे यांनी उत्कृष्ट भाषण केले.त्यानिमित्ताने राहुल ग्‍यानोबा वाठोरे यांच्या कडून त्याला एक साऊ हे पुस्तक भेट म्हणून दिले.

सहभागी विद्यार्थ्यांनी सुध्दा खुप छान भाषणं केली त्यांना सुध्दा मुलगंध कुटी बुद्ध विहार कमिटी नागसेन नगर हदगाव तर्फे प्रोत्साहन पर एक एक पेन्सिल त्यांना भेट म्हणून दिली.वर्षातील येणाऱ्या सर्व पौर्णिमा व त्या पौर्णिमेचं महत्व विहारात वाचन करून दाखविल्या जाते, तसेच भारतातील सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त विहारात त्यांच्या जिवनचरिञावर भाषण केले जाते सर्व विद्यार्थ्यी सहभागी होतात हा उपक्रम नागशेन नगरातील विहारात राबविण्यात येतो.

महापुरुषांच्या विचारांचा जागर सतत कार्यरत रहावा
मुलांनी महापुरुषांच जिवन चरित्र वाचलं पाहिजे हा उद्देश असाच उपक्रम गावागावांतील विहारातून व्हावा यासाठी गावागावात मोठ्या प्रमाणात विहारांची निर्मिती व्हावी अशी माहिती मुलगंध कुटी बुद्ध विहार कमिटी नागसेन नगर हदगाव चे अध्यक्ष-राहुल वाठोरे यांनी दिली.राहुल वाठोरे सर अध्यक्ष जयपाल जमदाडे सचिव अमोल नरवाडे सर कोषाध्यक्ष जय पंडित सहसचिव आर्यन शिनगारे महासचिव विक्रांत चौरे सदस्य निहार शिंगनकर सदस्य सदेंश रायठक सदस्य प्रा. डॉ. बि. एम. नरवाडे सर निधी सल्लागार, अँड. धम्मपाल पाईकराव सर विधी सल्लागार महेंद्र पाल बनसोडे, पंकज रणविर, सिद्धार्थ डाखोरे, व नवयुवक मित्र मंडळ नागसेन नगर हदगाव