सावित्रीच्या लेकीना शैक्षणिक साहित्य वाटप

30

✒️शेगाव बू (मनोज गाठले, प्रतिनिधी)मो:-9767883091

शेगाव(दि.4जानेवारी):-परिसरातील युवा शिक्षण प्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या अनेक उपक्रमातून गावा गावात अनेक सामाजिक कार्य सुरू असून आज स्त्री शिक्षणाची जननी माई क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे. तर यात आज शालेय विद्यार्थ्यानं विशेष मार्गदर्शन करून या प्रसंगी शालेय साहित्य वाटप करण्यात आले तर सावित्रीच्या लेकीचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.

शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला वंदन म्हणुन किसान युवा क्रांति संघटना भद्रावती तालुका अध्यक्ष रविंद्र भाऊ गेजीक यांच्या नेतुवात किसान युवा क्रांति संघटना यवतमाल तालुका महागाव सचिन बहादुरे यांच्याकडून महागाव तालुक्यातील मोरथ या गावी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप केले. त्या वेडी त्या गावातील शिक्षक आनी गावातिल सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते