कर्तव्यदक्ष महिला पोलीस निरीक्षकाच्या बदलीच्या विरोधात जागरुक नागरीक मंच व भाकपच्या वतीने आंदोलन

37

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.4जानेवारी):-पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांची अचानक पणे बदली केल्याने पोलीस प्रशासनाच्या या तुघलकी कारभारा विरोधात अनेक पक्ष व संघटनेच्या वतीने अंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यात काही पक्ष व संघटनांनी थेट मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री यांना बदली रद्द करण्यात यावी या साठी निवेदने पाठवली आहेत.

वसुंधरा बोरगावकर यांनी आपल्या कार्यकाळात अवैध धंदे करणाराना पळता भुई थोडी केली होती त्या मुळे शहरा सह ग्रामीण भागातील ही जुगार मटका आणी अवैध दारु बंद केली होती. त्या मुळे काही राजकिय नेत्यांच्या कार्यकर्त्याची आडचन झाली होती तरी त्या मुळे राजकीय पुढाऱ्यांना न जुमानता गरीबांना न्याय देण्याची भुमिका ठेवली.त्या मुळे अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना खटकत आसल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे का?पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या विरोधात नागरीकानी आंदोलन करणे म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणावी लागेल.

अन्यथा नागरीक सहसा पोलीसांच्या बाजुने उभे राहत नाहीत. त्या मुळे नेत्यांनी ही जनभावनेचा उद्रेक बघण्याचा प्रयत्न करु नये.याची जिल्हा पोलीस अधीक्षक व गृहमंत्रालय यांनी दखल घेणे आवश्यक आहे. कारण लोकशाही मध्ये जनतेच्या भावनेचा आदर करणे महत्त्वाचे आसते. विषेश म्हणजे पुरुषी वर्चस्ववादी अस्मितेचा व अहंकाराचा महीला अधिकारी बळी ठरतात त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. कारण हेटाळणी. वारंवार बदली होणे. नाहक वरिष्ठानी सर्वासमोर अपमाणीत करणे. अशा प्रकारचा त्रास महीला अधिकाऱ्यांना करावा लागतो. अशा वेळी त्यांच्या कर्तव्यदक्ष महीला अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्ष तेचा सहानुभूतीने विचार करून त्यांना कायदेशीर व लोकशाही मार्गाने संरक्षण देणे हे सरकारचे जेवढे कर्तव्य आहे तेवढेच समाजातील जागरुक नागरिकांचे ही कर्तव्य आहे..

स्वछ प्रामाणिक पणे सरकार व जनतेमध्ये समन्वय साधत काम करणाऱ्या महीला अधिकाऱ्याबद्दल लोकांमध्ये अपुलकी ची भावना आहे त्यामुळे बदली करविणार्या शक्तीची चौकशी होणे गरजेचे असुन पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जागरुक नागरिक मंच च्या वतिने दि. 05/01/2022 रोजी गंगाखेड तहसिल कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी ओमकार पवार यांची स्वाक्षरी केली.